नवी दिल्ली - भारताच्या सेवा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत असून, २0१८-१९ या वित्त वर्षाची सुरुवातही चांगली झाली आहे. नव्या आॅर्डर्समध्ये मोठी वाढ झाली असून, रोजगारनिर्मिती ७ वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले.
निक्केई इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) एप्रिलमध्ये वाढून ५१.३ झाला आहे. मार्चमध्ये तो ५0.३ होता. हा इंडेक्स ५0 च्या वर असल्यास विस्तार, तर ५0 च्या खाली असल्यास संकोच दर्शवितो.
देशातील सेवा क्षेत्रातील ४00 खासगी कंपन्यांकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे हा इंडेक्स तयार करण्यात आला आहे. भारतीय सेवा क्षेत्रातील घडामोडी वाढल्या असल्याचे एप्रिलच्या अहवालात दिसून आले आहे. याशिवाय रोजगारातही मार्च २0११ नंतर सर्वाधिक गतीने वाढ झाली आहे. गेल्या महिन्यातील रोजगारविषयक आकडेवारीवरून मोदी सरकारवर टीकेचा भडीमार झाला होता. या पार्श्वभूमीवर ताजी आकडेवारी सरकारला दिलासा देणारी आहे.
आयएचएस मार्किटच्या अर्थतज्ज्ञ आश्ना दोधिया यांनी सांगितले की, एप्रिलच्या तिमाहीत भारतीय सेवा क्षेत्राने चांगली
सुरुवात केलेली पाहणे हे उत्साहवर्धक आहे. या क्षेत्रातील आऊटपूटमध्ये वृद्धीला गती मिळाली आहे, तसेच मागणीच्या स्थितीतही सुधारणा झाली आहे.
फेब्रुवारीत होती घट
या क्षेत्रात फेब्रुवारीमध्ये तात्पुरती घसरण झाल्याचे दिसून आले होते. तेवढा एक अपवाद वगळता हे क्षेत्र सातत्याने वृद्धी नोंदवत आहे. वास्तविक जीडीपीमध्ये सेवा अर्थव्यवस्थेचा वाटा सर्वाधिक आहे; मात्र उत्पादन क्षेत्राची कामगिरी या क्षेत्रापेक्षा सातत्याने चांगली राहत आली आहे. याचा परिणाम म्हणून खाजगी क्षेत्राची वृद्धी मध्यम स्वरूपाची व ऐतिहासिक कलापेक्षा खालीच आहे.
देशात रोजगारनिर्मिती ७ वर्षांच्या उच्चांकावर, सरकारला दिलासा
भारताच्या सेवा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत असून, २0१८-१९ या वित्त वर्षाची सुरुवातही चांगली झाली आहे. नव्या आॅर्डर्समध्ये मोठी वाढ झाली असून, रोजगारनिर्मिती ७ वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:51 AM2018-05-05T01:51:51+5:302018-05-05T01:51:51+5:30