मुंबई - डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट प्रोवाइडर ईमुद्रा लि. १ जून रोजी शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. ई मुद्रा शेअर्सनं ६ टक्के प्रमियमसह बीएसईमध्ये २७१ रुपये शेअर लिस्टिंग झाला आहे. गुंतवणूकदारांना प्रति शेअर १५ रुपये लिस्टिंग गेन फायदा झाला आहे. या शेअरची इश्यू बेस्ड प्राइस २५६ रुपये प्रति शेअर होती.
लिस्टींगनंतर शेअर बाजारात उसळी मिळाल्यानंतर प्राइस २७६ रुपयांपर्यंत पोहचले होते. ई मुद्रा आयपीओ २० मे रोजी उघडला होता तर २४ मे रोजी बंद झाला होता. जवळपास १६१ कोटी रुपये नवीन शेअर्स जारी करण्यात आले होते. एलआयसी, अदाणी विल्मर, कॅम्पस एक्टिवियरनंतर ही १५ वी लिस्टींग आहे. ४१३ रुपये आयपीओमध्ये १६१ कोटी रुपये नवीन शेअर्स आणि गुंतवणूकदारांकडून २५२ कोटी शेअर खरेदी करण्यात आले. बीएसईमध्ये ई मुद्रा शेअर लिस्टिंग ५.८६ टक्के प्रिमियमसह २७१ रुपयेपर्यंत पोहचली. तर एनएसई मध्ये ५.४७ टक्के प्रिमियमसह २७० रुपये प्रति शेअर दर झाले. ई मुद्रा शेअर्सच्या लिस्टिंगनंतर अवघ्या १० मिनिटांत शेअर BSE आणि NSE मध्ये २७९ रुपये उच्चांक दर गाठले होते.
कंपनीच्या IPO ची खास वैशिष्टेई मुद्रा कंपनीच्या आयपीओत प्राइस बेस्ड २४३-२५६ रुपये निश्चित करण्यात आला होता ज्याची फेस व्हॅल्यू ५ रुपयांपर्यंत होती. एका लॉटसाठी बोली लावण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ८४८ रुपये गुंतवणूक करायची होती. तर कमाल १३ लॉटसाठी गुंतवणुकीची मर्यादा होती. २७ मे रोजी शेअर अलॉटमेंट झाले होते. ई मुद्राने पब्लिक इश्यूचा अर्धा हिस्सा म्हणजे ५० टक्के QIB साठी राखीव ठेवला होता.
या कंपनीची स्थापना १६ जून २००८ मध्ये झाली होती. ही आयटी कंपनी 3i Infotech ची भागीदारी कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स मार्केटमध्ये ३७.९ टक्के भाग कब्जा केला होता. ही कंपनी ग्राहकांना २ प्रकारच्या सुविधा देते. त्यात डिजिटल ट्रस्ट सर्व्हिसेस आणि एंटर प्राइज सॉल्यूशनचा समावेश आहे.