रल्वे स्थानकावरील घटना : पाच तासांनंतर आली घटना उघडकीसपुणे : सोलापूर-पुणे पॅसेंजरमधील प्रवासात सात वर्षांच्या मुलीने स्वत:च्या आईचा दुर्दैवी मृत्यू पाहिला. पुणे रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी उतरल्यानंतर ही गाडी यार्डामध्ये साईिडंगला लागली. त्या रिकाम्या गाडीमध्ये ही मुलगी आईच्या मृतदेहापाशी बसून पाच तास रडत होती. एका कर्मचार्याच्या ही बाब लक्षात आली. त्याने पोलिसांना बोलावल्यानंतर पुढची कार्यवाही सुरू झाली.हसिना रफीक शेख (३५) व सना (७, रा. बार्शी, जि. सोलापूर) या मायलेकी चार दिवसांपूर्वी सोलापूरहून पुण्यासाठी निघाल्या होत्या. हसिना आजारी होत्या. प्रवासादरम्यान त्यांचा डोळा लागला. पुण्याला पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. पुणे स्थानकावर सर्व प्रवासी खाली उतरले. रिकामी पॅसेंजर यार्डामध्ये साईिडंगला लावण्यात आली.आई हालचाल करीत नाही, काहीच बोलत नाही म्हटल्यावर सना हिला रडू कोसळले. कोणाची मदत मागावी तर संपूर्ण गाडीच रिकामी. तब्बल पाच तास सना मृतदेहाजवळ बसून रडत होती. स्वच्छता कर्मचार्याला सनाच्या रडण्याचा आवाज आला. तो तिथे गेल्यावर सर्व गोष्टींचा त्याला उलगडा झाला आणि त्याने त्वरित रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली.हसिना यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी सनाला शांत केले. तिच्याशी आपुलकीने संवाद साधत कुटुंबाची माहिती विचारली. हसिना यांचा मृतदेह ससूनला हलवण्यात आला. सना हिच्याकडून माहिती मिळवून परमार यांनी पोलीस कर्मचार्यांना बार्शीला पाठवले. परंतु त्यांच्या मूळ गावी कोणीही नातेवाईक मिळाला नाही. सगळे घर सोडून अन्य ठिकाणी रहायला गेल्याचे समजले. पोलीस अद्यापही सनाच्या नातेवाईकांचा शोध घेत असून तिला तूर्तास शासकीय सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले आहे.
मुलीच्या डोळ्यांसमोर आईचा अंत
रेल्वे स्थानकावरील घटना : पाच तासांनंतर आली घटना उघडकीस
By admin | Published: September 29, 2014 09:47 PM2014-09-29T21:47:15+5:302014-09-29T21:47:15+5:30