-प्रसाद गो. जोशी
टाटा ग्रुपमधील वादामुळे कमी झालेल्या विविध आस्थापनांच्या समभागांमध्ये होत असलेली सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरू असलेली खनिज तेलाच्या दरामधील घसरण या दोन प्रमुख घटनांनी, गतसप्ताहात बाजारावर परिणाम घडविला. सप्ताहाचा अखेरचा दिवस हा विक्रम संवत्सरातील व्यवहारांचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी बाजार वाढीव पातळीवर बंद झाला, ही आशादायक बाब ठरली.
मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहामध्ये झालेल्या पाच दिवसांच्या व्यवहारांपैकी तीन दिवस संवेदनशील निर्देशांकामध्ये वाढ झालेली दिसून आली, तर दोन दिवस निर्देशांक घटला. सप्ताहाच्या अखेरीस तो २७९४१.५१ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यात १३५.६७ अंशांनी घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक(निफ्टी)ही घटला.
टाटा उद्योग समूहातील वादाचा परिणाम बाजारावर झालेला दिसून आला. टाटांच्या विविध आस्थापनांच्या समभागांची किंमत कमी झाल्याने, खरेदीसाठी गर्दी झालेली दिसून आली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या घसरत्या किमती आणि उत्पादनाबाबत ओपेक देशांमध्ये एकमत होत नसल्याने, त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक झालेला दिसून आला. त्याचप्रमाणे, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आणि फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीचा परिणामही बाजारवर होत आहे. भारत- पाकिस्तान दरम्यानचा वाढता तणावही बाजारावर नकारात्मक परिणाम करताना दिसत आहे.
विक्रम संवत २०७२ चा शेवट हा सकारात्मक झाला. या वर्षाच्या अखेरच्या दिवशी बाजार वाढीव पातळीवर बंद झाला, ही गुंतवणूकदारांसाठी जमेची बाजू होय. या संपूर्ण वर्षाचा विचार केला, तर ते गुंतवणूकदारांना लाभदायक राहिले आहे. वर्षभरामध्ये बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये ८ टक्क््यांनी, तर निफ्टीमध्ये १०.४ टक्क््यांनी वाढ झालेली दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अधिक प्रमाणात लाभ मिळत असून, त्याचे प्रतिबिंब वार्षिक वाढीमध्येही दिसून आले. या वर्षभरामध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये अनुक्रमे २४ आणि २० टक्क््यांनी वाढ झाली आहे. औषधे (फार्मा), माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि दूरसंचार (टेलिकॉम) या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वर्षामध्ये घट झालेली दिसून आली.
विक्रम संवत २०७२ मध्ये
परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारामध्ये मोठी गुंतवणूक केली.
या संस्थांनी ५.८ अब्ज डॉलर
म्हणजेच, ३८६०० कोटी रुपये
भारतीय शेअर बाजारामध्ये
गुंतविले. त्याचप्रमाणे, देशांतर्गत वित्तसंस्थांनीही ३३,४२३ कोटी रुपये शेअर बाजारामध्ये गुंतविले, तसेच छोटे गुंतवणूकदारही बाजारात सक्रीय होते.
>लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारामध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्ताचे सौदे होतात. गेल्या तीन वर्षांपासून या सौद्यांनंतर निर्देशांक वाढीव पातळीवर बंद होत आहे. विक्रम संवत २०६८(सन २०११) पासून दरवर्षी मुहूर्ताच्या सौद्यांना खुला होत असलेला निर्देशांक, आधीच्या बंद निर्देशांकापेक्षा वाढीव पातळीवर सुरू झाला आहे. संवत २०६८ व ६९ मध्ये मात्र, नंतर निर्देशांकामध्ये घट
होऊन तो खाली
येऊन बंद झाला आहे.
संवत्सराची आशादायक अखेर; सेन्सेक्समध्ये आठ टक्के वाढ
शेवटच्या दिवशी बाजार वाढीव पातळीवर बंद झाला, ही आशादायक बाब ठरली.
By admin | Published: October 31, 2016 06:42 AM2016-10-31T06:42:20+5:302016-10-31T06:42:20+5:30