Join us

१६०% प्रीमिअमवर लिस्ट झाला एनर्जी कंपनीचा IPO, लिस्टिंगनंतरही खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 1:28 PM

₹५२ वरून ₹१४७ वर आला शेअर 

Australian Premium Solar IPO Listing: ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर आयपीओची 18 जानेवारी रोजी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री झाली. कंपनीचे शेअर्स NSE वर 54 च्या इश्यू किमतीच्या तुलनेत 160 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले. शेअर्सची लिस्टिंग प्राईज 140 रुपये आहे. लिस्ट झाल्यानंतर, या शेअरला 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि तो 147 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. याचा अर्थ ज्या गुंतवणूकदारांना हे शेअर्स अलॉट झाले होते, त्यांनी पहिल्याच दिवशी प्रचंड नफा कमावला. त्यांची गुंतवणूक दुपटीनं वाढली. ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

मिळालेला उत्तम प्रतिसाद

या इश्यूला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तिसऱ्या दिवशी हा इश्यू 464.19 पट सबस्क्राइब झाला. रिटेल कॅटेगरी 535 पट सबस्क्राइब झाली आणि एनएचआय कोटा 770 पट सबस्क्राइब झाला होता. ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलरचा आयपीओ 11 जानेवारीला गुंतवणुकीसाठी उघडला आणि 15 जानेवारीला बंद झाला. या आयपीओची इश्यू प्राईज 51-54 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. 52 लाख शेअर्सचा हा फ्रेश इश्यू होता.

कंपनीबाबत माहिती

बीलाईन कॅपिटल अॅडव्हायझर्स या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर होते. चिमणभाई रणछोडभाई पटेल, सविताबेन चिमणभाई पटेल आणि निकुंजकुमार चिमणलाल पटेल हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. कंपनी निवासी, कृषी आणि व्यावसायिक बाबींसाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) सेवा प्रदान करते. कंपनी मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलिक्रिस्टलाइन सौर पॅनल निर्मितीचं काम करते. कंपनीचा उत्पादन प्रकल्प गुजरातमधील साबरकांठा येथे आहे.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक