Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्रीन एनर्जी कंपनीला मिळाली ₹550 कोटींची ऑर्डर; शेअरने 2 वर्षात दिला 145% परतावा...

ग्रीन एनर्जी कंपनीला मिळाली ₹550 कोटींची ऑर्डर; शेअरने 2 वर्षात दिला 145% परतावा...

Energy Stocks: एका आठवड्यात हा शेअर 10 टक्के वधारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:43 PM2024-08-12T15:43:57+5:302024-08-12T15:44:07+5:30

Energy Stocks: एका आठवड्यात हा शेअर 10 टक्के वधारला आहे.

Energy Stocks : Green energy company gets ₹550 crore order; Shares became a 'rocket', gave 145% return in 2 years | ग्रीन एनर्जी कंपनीला मिळाली ₹550 कोटींची ऑर्डर; शेअरने 2 वर्षात दिला 145% परतावा...

ग्रीन एनर्जी कंपनीला मिळाली ₹550 कोटींची ऑर्डर; शेअरने 2 वर्षात दिला 145% परतावा...

Sterling and Wilson Renewable Energy : ग्रीन एनर्जी कंपनी स्टर्लिंग अँड विल्सनसाठी आठवड्याचा पहिला दिवस अतिशय चांगला ठरला. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला राजस्थानमधील पीव्ही प्लांटसाठी 550 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली. ट्रेडिंग दरम्यान, बीएसई वर स्टॉक 2.40 टक्क्यांच्या वाढीसह 689.55 च्या पातळीवर पोहोचला. तर, गेल्या एका आठवड्यात हा 10 टक्क्यांनी वाढला आहे.

एक्सचेंज फाइलिंगनुसार, स्टर्लिंग आणि विल्सनला राजस्थानमध्ये 400 MW AC/633 MW DC प्रकल्पासाठी नवीन घरगुती सौर EPC ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये PV प्लांट आणि 33/220 KV पूलिंग सबस्टेशनचा EPC सामील आहे. या तिमाहीतील एकूण ऑर्डर इनफ्लो अंदाजे रु. 900 कोटी आहे, जो Q1FY25 मध्ये घोषित केलेल्या रु. 2,170 कोटींच्या ऑर्डर इनफ्लोव्यतिरिक्त आहे.

ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीचे ग्लोबल सीईओ अमित जैन म्हणाले की, आम्हाला ही ऑर्डर मिळाल्याचा खुप आनंद होतोय. या ऑर्डरसह आम्हाला 900 कोटी रुपयांच्या देशांतर्गत ऑर्डर मिळवल्या आहेत. हे पहिल्या तिमाहीतील घोषित 2,170 कोटी रुपयांच्या ऑर्डरच्या व्यतिरिक्त आहे. 

स्टर्लिंग आणि विल्सनचा शेअर 
ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर आठवडाभरात 10 टक्क्यांनी वाढला आहे. तर 3 महिन्यांत ती 3 टक्क्यांहून अधिक घसरलादेखील आहे. गेल्या 6 महिन्यांत हा 17 टक्के, या वर्षी आतापर्यंत 54 टक्के आणि गेल्या वर्षभरात 85 टक्के वाढला आहे. विशेष म्हणजे, या शेअरने गेल्या दोन वर्षांत 145% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Energy Stocks : Green energy company gets ₹550 crore order; Shares became a 'rocket', gave 145% return in 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.