Join us

मोठी कारवाई! मल्ल्या, नीरव आणि चोक्सीची ९,३७१ कोटी रुपयांची संपत्ती अखेर बँकांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 1:44 PM

बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे.

बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या ट्विटनुसार ईडीनं आतापर्यंत विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांची एकूण १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. बँकांच्या झालेल्या एकूण नुकसानापैकी ही रक्कम जवळपास ८०.४५ टक्के इतकी आहे. 

जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी मोठा हिस्सा सरकारी बँका आणि केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यात आल्याचंही ईडीनं म्हटलं आहे. यात एकूण ९ हजार ३७१ कोटी रुपयांचा समावेशआहे. मेहुल चोक्सी यानं एकट्यानंच पंजाब नॅशनल बँकेला १३,५०० कोटी रुपयांचा चूना लावला आहे. 

सध्याच्या घडीला विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे देशाचे मोस्ट वॉण्टेड आर्थिक थकबाकीदार आहेत. तिघांनाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच तिघांनाही भारतात आणलं जाईल अशी आशा आहे. तिघांनीही देशातील बँकांना हजारो कोटी रुपयांचा चूना लावला आहे. 

बँकांना एकूण २२ हजार ५८५ कोटींचा चूनाईडीनं दिलेल्या माहितीनुसार विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांनी सरकारी बँकांना एकूण २२ हजार ५८५ कोटी रुपयांचा चूना लावला आहे. तिघांची एकूण मिळून १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी ९६९ कोटींची मालमत्ता विदेशात आहे. सरकारी बँकांना आतापर्यंत ८,४४१ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. 

टॅग्स :विजय मल्ल्यानीरव मोदीअंमलबजावणी संचालनालय