हैदराबाद : शहरातील पदवीधर इंजिनिअर रोजगार मिळविण्यात मागे असल्याचा निष्कर्ष एका पाहणीतून समोर आला आहे. देशातील ५०० महाविद्यालयातून हे अध्ययन करण्यात आले आहे. आयटीशी संबंधित शाखांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. नवी दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता या शहरातील इंजिनिअर्सच्या तुलनेत हैदराबादेतील इंजिनिअर प्रोगामिंग कौशल्याच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
हैदराबादेतील इंजिनिअर विद्यार्थ्यांची प्रोग्रामिंग क्षमता सुमार दर्जाची असल्यामुळेच रोजगार मिळविण्यात ते मागे असल्याचेही या पाहणीतून समोर आले आहे. रोजगार योग्यता मूल्यांकन कंपनी ‘अॅस्पिरिंग माइंड’ने हा अहवाल प्रकाशित केला आहे. चांगल्या शिक्षकांची आणि शिकविण्याच्या पद्धतीची कमतरताही याला कारणीभूत असल्याचे यात म्हटले आहे.
‘अॅस्पिरिंग माइंड’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी वरुण अग्रवाल याबाबत बोलताना म्हणाले की, प्रोग्रामिंग कौशल्याच्या अभावाचा परिणाम आयटी क्षेत्रावर होत आहे. कौशल्य विकासासह हे पदवीधर तयार करण्याची आवश्यकता आहे. फक्त विद्यार्थ्यांच्या क्षमतेसाठीच नव्हे तर उद्योग क्षेत्राची गरज म्हणूनही याकडे पाहिले गेले पाहिजे. दरम्यान, शहरातील ०.७ टक्के विद्यार्थी लॉजिकली कोड लिहिण्यात अयशस्वी ठरल्याचेही समोर आले आहेत. (वृत्तसंस्था)
हैदराबादचे इंजिनीअर रोजगारात पिछाडीवर
: शहरातील पदवीधर इंजिनिअर रोजगार मिळविण्यात मागे असल्याचा निष्कर्ष एका पाहणीतून समोर आला आहे. देशातील ५०० महाविद्यालयातून
By admin | Published: May 8, 2017 12:32 AM2017-05-08T00:32:38+5:302017-05-08T00:32:38+5:30