Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘टॅक्समन गो’चाही आनंद घ्या!

‘टॅक्समन गो’चाही आनंद घ्या!

कृष्णा, सध्या दोन विषय जोरात चालू आहेत. एक मोबाइल गेम्स् ‘पॉकेमॉन गो’ व दुसरा आयकर अघोषित उत्पन्न डिक्लरेशन स्कीम २०१६.

By admin | Published: August 1, 2016 04:08 AM2016-08-01T04:08:41+5:302016-08-01T04:08:41+5:30

कृष्णा, सध्या दोन विषय जोरात चालू आहेत. एक मोबाइल गेम्स् ‘पॉकेमॉन गो’ व दुसरा आयकर अघोषित उत्पन्न डिक्लरेशन स्कीम २०१६.

Enjoy Taxman's Go! | ‘टॅक्समन गो’चाही आनंद घ्या!

‘टॅक्समन गो’चाही आनंद घ्या!


अर्जुन (काल्पनीक पात्र) : कृष्णा, सध्या दोन विषय जोरात चालू आहेत. एक मोबाइल गेम्स् ‘पॉकेमॉन गो’ व दुसरा आयकर अघोषित उत्पन्न डिक्लरेशन स्कीम २०१६.
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, जागोजागी सभा, चर्चासत्र, जाहिराती, नरेंद्र मोदी, अरुण जेठली साहेबांचे वक्तव्ये इत्यादी. वर्तमानपत्रात जोरदार मोहीम चालू आहे. पॉकेमॉन गो या खेळात आणि आयकरातील अघोषित उत्पन्न शोधण्याची योजना यात बरेच काही साम्य असू शकते. पॉकेमॉन आणि टॅक्समन यांच्या खेळातील साम्य ज्ञानवर्धनासाठी जाणून घेऊ या.
अर्जुन : कृष्णा, या आयकरातील इन्कम डिक्लरेशन स्कीम काय आहे व त्याची ऐवढी प्रसिद्धी का?
कृष्ण : अर्जुना, या स्कीमची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
१) जर दडविलेली रक्कम उघड करण्यासाठी या स्कीममध्ये अर्ज केला, तर दडविलेल्या उत्पन्नावर ३० टक्के आयकर, ७.५ टक्के सरचार्ज व ७.५ टक्के दंड असे एकूण ४५ टक्के कर भरावा लागेल.
२) या स्कीममधील घोषित कोणतेही उत्पन्न किंवा या उत्पन्नातून गुंतवणूक संपत्तीमध्ये केली असेल, तर ती व त्याचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०१५ - १६ पर्यंत असावे, तसेच करदात्याने आयकर रिटर्न दाखल केलेले नसेल किंवा आयकर रिटर्नमध्ये हे उत्पन्न घेतले नसेल, तर या स्कीममध्ये जाता येईल.
३) जर करपात्र उत्पन्न संपत्ती असेल, तर त्या संपत्तीचे मूल्य १ जून २०१६च्या फेअर मार्केट व्हॅल्यू अनुसार घ्यावे लागेल. उदा. जर एखादी संपत्ती जमीन २०१०-११ मध्ये रु. ३ लाखाला घेतली असेल व त्याचे फेअर मार्केट व्हॅल्यू (स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू) १ जून २०१६ ला रु. ५ लाख असेल, तर त्याला या स्कीमध्ये रु. ५ लाख व कर भरावा लागेल. या योजनेत सोने, हिरे, मोती, दागिने इत्यादी जाहीर करता येतील.
४) या स्कीममध्ये १ जून २०१६ पासून ३० सप्टेंंबर २०१६ पर्यंत अर्ज दाखल करता येईल.
५) या स्कीममध्ये करदात्याला कमीत कमी २५ टक्के कर, सरचार्ज व दंड ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत, ५० टक्के ३१ मार्च २०१७ आणि १०० टक्के ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत भरावे लागेल.
६) या स्कीमचा अर्जदार व त्याची माहिती गोपनीय राहील.
जसे आयकरातील जे लपून बसलेले आहे आणि त्यांच्याकडे काळा पैसा किंवा अघोषित उत्पन्न
आहे, अशांचा शोध कर अधिकारी (टॅक्समन) घेत आहेत. जसे
पॉकेमॉन गेम्स्मध्ये विविध पॉकेमॉन शोधून त्यांना पॉक बॉल्सद्वारे पकडावे लागते.
अर्जुन: कृष्णा, पॉकेमॉन गो खेळाची काय वैशिष्ट्ये आहेत?
कृष्ण : अर्जुना, पॉकेमॉन गो मोबाइलमध्ये खेळला जातो. यात विविध ठिकाणी मोबाइल घेऊन फिरावे लागते. पॉकेमॉन शोधण्यासाठी प्रत्येक घरात, रस्त्यावर, चौकात, शहरात, विविध ठिकाणी पॉकेमॉन लपलेले असतात. त्यांचा शोध मोबाइलच्या जिपीएस आणि कॅमेराद्वारे करावा लागतो. पॉकेमॉनला पॉक बॉल्स फेकून धरावे लागते, असे विविध पॉकेमॉन्स् गोळा करून फौज वाढवावी लागते. पॉकशॉप्समध्ये शस्त्र इत्यादी मिळवले जाऊ शकतात. त्या पॉक शॉप्ससुध्दा शहरात कोठे आहे, तेथे शोधून जावे लागते. तद्नंतर पॉकेमॉनच्या फौजेला शस्त्रसाठ्याद्वारे शहरात विविध ठिकाणी असलेल्या विविध युद्धांच्या मैदानावर युद्ध लढावी लागतात. पुढच्या लेव्हलमध्ये खेळ - खेळण्यासाठी असे युद्धे जिंकून जावे लागते व यशस्वी व्हावे लागते. पॉकेमॉन शोधून यासाठी वाय-फाय चालू ठेवून विविध शहरांतील ठिकाणावर फिरावे लागते. देशभरात या खेळाने धुमाकूळ घातला आहे. याचसारखे दडवलेले नगद, जमीन, सोने, हिरे, मोती, दागिने इत्यादी शोधणे व ते जाहीर करायला लावणे याचा प्रयत्न टॅक्समन करीत आहे. देशभर ७ लाखांच्या वर करदात्यांना नोटिसा ई-मेल्स, एसएमएस, जाहिरात टीव्हीवर इत्यादी माध्यमाने दिल्या जात आहेत. आयकराच्या माहितीसाठी ६६६.्रल्लूङ्मेी३ं७्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल यावर नागरिक आपल्या मोबाइलवरसुध्दा माहिती घेऊ शकतात.
अर्जुन: कृष्णा, आयकर अधिकारी म्हणजेच टॅक्समन यांची या स्कीममध्ये काय परिस्थिती आहे?
कृष्ण: अर्जुना, आयकर अधिकारी जो करदाता अघोषित उत्पन्न दडवून बसला आहे, अशा करदात्याचा शोध घेत आहे. प्रत्येक शहरातील अधिकारी अशा करदात्याची यादी, मोठ-मोठाले आर्थिक व्यवहारावर कडक नजर ठेऊन आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक इत्यादीद्वारे अशा करदात्याचा शोध ते घेत आहेत.
या आयकर इन्कम डिक्लरेशन स्कीमचा फायदा लपलेल्या करदात्यांनी घ्यावयाचा आहे. जसे पॉकेमॉन गो मध्ये माहीत पडते. पॉकेमॉन कोठे लपलेला आहे, तसेच संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आयकर खात्यास अनेक व्यवहार माहीत पडतात.
>पॉकेमॉन गो आणि इन्कम डिक्लरेशन स्कीममध्ये काय फरक?
पॉकेमॉन गो मध्ये लपलेले पॉकेमॉन शोधायचे आणि पॉइंटस् गोळा करायचे, तर इन्कम डिक्लरेशन स्कीममध्ये करदात्यांना संधी दिली आहे की, लपवलेले उत्पन्न जाहीर करावयाचे आणि त्यावर शासनाने कर गोळा करावयाचे.
पॉकेमॉन गो मध्ये प्रतिस्पर्धी हाही दुसरा खेळाडू आहे, जो की, पॉकेमॉन गोळा करून आपल्याशी लढतो. आयकरमध्ये प्रतिस्पर्धी हा कर न भरणारा करदाता आहे व त्याला शोधून व्याज व दंडासोबत कर भरून घेणे हे उद्दिष्ट आहे.
>करदात्याने यातून
काय बोध घ्यावा ?
पॉकेमॉन हा एक खेळ आहे, परंतु त्याच्या नादी लागून देशभरात अनेक जण असा जीवघेणा खेळ खेळत आहेत. टॅक्समन हा खेळ देशाच्या उन्नतीसाठी कर गोळा करणे या उद्देशाने खेळला जात आहे.
आयकर कायद्याचे पालन करून नियमाप्रमाणे नियमित कर भरण्यास त्रास होत आहे. मात्र, ३० सप्टेंबरला योजना संपल्यानंतर जसे पॉकेमॉनला धरतात, तसे टॅक्समन करचोरी करणाऱ्याला सर्वे, धाड, चौकशीद्वारे धरेल.
म्हणून या आयकर कायद्याशी खेळ खेळणेही महागात पडेल. सध्याच्या आयकर डिक्लरेशन स्कीमअंतर्गत अघोषित उत्पन्न जाहीर करून आनंदाने जीवनात खेळावे.
-सी. ए. उमेश शर्मा

Web Title: Enjoy Taxman's Go!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.