Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनोरंजन, माध्यम उद्योगाचा महसूल ४ वर्षांत जाणार ७३.६ अब्ज डॉलरवर

मनोरंजन, माध्यम उद्योगाचा महसूल ४ वर्षांत जाणार ७३.६ अब्ज डॉलरवर

वृद्धीदरही १०.६ टक्क्यांवरून घसरून ५.४ टक्क्यांवर आला. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये भारतातील मनोरंजन व माध्यम क्षेत्राचा महसूल १५.९ टक्क्यांनी वाढून ४६,२०७ दशलक्ष डॉलर झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:29 PM2023-11-08T13:29:27+5:302023-11-08T13:29:37+5:30

वृद्धीदरही १०.६ टक्क्यांवरून घसरून ५.४ टक्क्यांवर आला. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये भारतातील मनोरंजन व माध्यम क्षेत्राचा महसूल १५.९ टक्क्यांनी वाढून ४६,२०७ दशलक्ष डॉलर झाला.

Entertainment, media industry revenue to reach 73.6 billion dollars in 4 years | मनोरंजन, माध्यम उद्योगाचा महसूल ४ वर्षांत जाणार ७३.६ अब्ज डॉलरवर

मनोरंजन, माध्यम उद्योगाचा महसूल ४ वर्षांत जाणार ७३.६ अब्ज डॉलरवर

नवी दिल्ली : भारताचा मनोरंजन व माध्यम उद्योगाचा महसूल दरवर्षी ९.७ टक्के दराने वाढून २०२७ पर्यंत ७३.६ अब्ज डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज पीडब्ल्यूसीच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 
‘जागतिक मनोरंजन व माध्यम परिदृश्य २०२३-२०२७’ या अहवालात पीडब्ल्यूसीने म्हटले की, २०२२ मध्ये जागतिक पातळीवर मनोरंजन व माध्यम क्षेत्राचा महसूल घटून २.३२ लाख कोटी डॉलरवर आला. वृद्धीदरही १०.६ टक्क्यांवरून घसरून ५.४ टक्क्यांवर आला. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये भारतातील मनोरंजन व माध्यम क्षेत्राचा महसूल १५.९ टक्क्यांनी वाढून ४६,२०७ दशलक्ष डॉलर झाला. (वृत्तसंस्था) 

ओटीटी, ओओएच, गेमिंगमधूनही फायदा
- भारतीय मनोरंजन व माध्यम क्षेत्रात ओटीटी प्लॅटफॉर्म, गेमिंग, पारंपरिक टीव्ही, इंटरनेट आणि आऊट-ऑफ-होम (ओओएच) या सर्वांचीच चांगली कामगिरी राहील. 
- जाहिराती आणि मेटाव्हर्सचा वापर यातून उद्योगास महसूल मिळेल, असे अहवालात म्हटले आहे. २०२२ मध्ये सुरू झालेल्या ५जी सेवेचा उद्योगास फायदा होईल.

Web Title: Entertainment, media industry revenue to reach 73.6 billion dollars in 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.