Enviro Infra Engineers Share Price: सीवेज ट्रिटमेंट सोल्यूशन्स प्रदाता एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्सचा आयपीओ (Enviro Infra Engineers IPO) शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. आज बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्सचा शेअर (Enviro Infra Engineers Share) आज बीएसईवर २१८ रुपयांवर लिस्ट झाला, जो आयपीओच्या १४८ रुपयांच्या किमतीपेक्षा ४७.३० टक्क्यांनी अधिक आहे. एनएसईवर हा शेअर ४८ टक्के प्रीमियमसह २२० रुपयांवर लिस्ट झाला. हा आयपीओ २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि तीन दिवसांत जवळपास ९० पट सब्सक्राइब झाला.
आयपीओ कधी खुला झाला?
गेल्या आठवड्यात २२ नोव्हेंबररोजी या कंपनीचा आयपीओ उघडण्यात आला होता. गुंतवणूकदारांनी २६ नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येणार होती. कंपनीनं १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरसाठी १४० ते १४८ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांनी या आयपीओला जोरदार प्रतिसाद दिला. मंगळवारी इश्यू बंद झाल्यानंतर हा आयपीओ ९० पट ओव्हरसब्सक्राइब झाल्याचही समोर आलं.
त्यात बहुतांश क्यूआयबींनी बोली लावली. ही श्रेणी १५७.०५ पट अधिक सब्सक्राइब झाला आहे. यानंतर एनआयआयनं बोली लावली. ही श्रेणी १५३.८० पटींपेक्षा अधिक सब्सक्राइब झाली. तर किरकोळ गुंतवणूकदारांची श्रेणीही २४.४८ पट ओव्हरसब्सक्राइब झाली.
काय आहेत तपशील?
एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्सनं गुरुवारी अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे १९५ कोटी रुपये उभे केले होते. कंपनीच्या IPO मध्ये ३.८७ कोटी इक्विटी शेअर्सच्या ताज्या इश्यूव्यतिरिक्त, प्रवर्तकांनी ५२.६८ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत ठेवले होते. सध्या, एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्समध्ये प्रवर्तकांचे ९३ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. कंपनी सरकारी प्राधिकरण/संस्थेसाठी पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि पाणी पुरवठा योजना प्रकल्पांचे डिझाईन, बांधकाम, ऑपरेशन आणि देखभाल यात काम करते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)