नवी दिल्ली : खाण आणि धातूसम्राट अनिल अग्रवाल यांच्या पारिवारिक ट्रस्टच्या मालकीच्या व्होलकॅन इन्व्हेस्टमेंटस्कडून (व्हीआय) बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनासाठी इरादापत्र (ईओआय) सादर केले आहे. ट्रस्टने म्हटले आहे की, इरादापत्र ‘शोधक’ (एक्स्प्लोरेटरी) स्वरूपाचे असून, त्याचा वेदान्ताशी कोणताही संबंध नाही.
जेटच्या समाधान व्यावसायिकांनी निश्चित केलेल्या मुदतीत तीन इरादापत्रे सादर झाली आहेत. पनामास्थित निधी संस्था ‘अॅव्हॅन्ट्यूलो समूहा’नेही इरादापत्र सादर केले आहे. जेटमध्ये २४ टक्के हिस्सेदारी असलेली कतारची इतिहाद एअरवेज ही कंपनी या प्रक्रियेपासून दूरच आहे.
ट्रस्टने निवेदनात म्हटले आहे की, अग्रवाल यांची गुंतवणूक कंपनी असलेल्या ‘व्होलकॅन इन्व्हेस्टमेंट’ने शोधक कृती म्हणून जेट एअरवेजसाठी इरादापत्र सादर केले. कंपनीसाठी, तसेच उद्योगासाठी व्यवसाय परिदृश्य समजूत घेता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. आणखी एक एनआरआय व्यवसाय समूह ‘हिंदुजा’ने जेटमध्ये रस दाखविला होता. तथापि, त्यांनी इरादापत्र सादर केलेले नाही.
आर्थिक विवंचनेमुळे जेट एअरवेज ही कंपनी १७ एप्रिल २0१९ रोजी बंद पडली. समाधान व्यावसायिकांकडून मंगळवारपर्यंत पात्र निविदेबाबत निर्णय घेतला जाईल.
व्होलकॅन इन्व्हेस्टमेंटस्कडून ‘जेट’ला इरादापत्र
खाण आणि धातूसम्राट अनिल अग्रवाल यांच्या पारिवारिक ट्रस्टच्या मालकीच्या व्होलकॅन इन्व्हेस्टमेंटस्कडून (व्हीआय) बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनासाठी इरादापत्र (ईओआय) सादर केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:09 AM2019-08-13T03:09:51+5:302019-08-13T03:10:06+5:30