- सोपान पांढरीपांडेनागपूर : शनिवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात एम्प्लॉईज प्रॉव्हिडंड फंडची (ईपीएफ-९५) पेन्शन वाढू शकते, अशी माहिती ईपीएफ पेन्शनधारक संघर्ष समितीचे प्रमुख कमांडर अशोक राऊत यांनी दिली. ‘लोकमत’ला त्यांनी सांगितले, संघर्ष समितीने आॅगस्ट २०१९ मध्ये पेन्शन कशी वाढू शकते याचा विस्तृत प्रस्ताव श्रम मंत्रालयाला सादर केला होता.गेल्या २१ डिसेंबरला श्रममंत्री गंगवार यांनी संघर्ष समितीच्या प्रतिनिधीशी चर्चा केली व प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देऊन अर्थमंत्रालयाला पाठवला. सध्या ईपीएफ अंतर्गत किमान पेन्शन १००० व कमाल २५०० आहे. ती वाढली तर ६५ लाख पेन्शनधारकांचा फायदा होईल, असे राऊत म्हणाले, परंतु पेन्शन किती वाढेल हे सांगण्यास नकार दिला.
ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:41 AM