EPF Calculation: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ एक रिटायरमेंट बनेफिट स्कीम आहे. कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्या वतीनं ईपीएफ खात्यात योगदान दिलं जातं. हे योगदान मूळ वेतनाच्या (+DA) 12-12 टक्के आहे. ईपीएफचं व्याजदर सरकार दरवर्षी ठरवते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफचा व्याजदर वार्षिक 8.15 टक्के आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ईपीएफ खातं मॅनेज करतं. ईपीएफ हे असे खाते आहे, ज्यामध्ये निवृत्तीपर्यंत हळूहळू मोठा निधी तयार होतो.
30 वर्षे वय 10000 बेसिक
समजा तुमचं मूळ वेतन (+DA) 10,000 रुपये आहे आणि वय 30 वर्षे आहे. सेवानिवृत्तीचं वय 58 वर्षे आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे योगदानासाठी 28 वर्षे आहेत. ईपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, या आधारावर, जेव्हा सेवानिवृत्तीपर्यंत पीएफची गणना केली जाते, तेव्हा सुमारे 67 लाखांचा निधी तयार होऊ शकतो. यामध्ये दरवर्षी 10 टक्के वार्षिक वेतनवाढीचा समावेश करण्यात आलाय.
मूळ वेतन + DA = ₹10,000
सध्याचे वय = 30 वर्षे
सेवानिवृत्तीचे वय = 58 वर्षे
कर्मचारी मासिक योगदान = 12%
कंपनीचं मासिक योगदान = 3.67%
EPF वर व्याज दर = 8.15% प्रतिवर्ष
वार्षिक पगार वाढ = 10%
58 वर्षे वयाचा मॅच्युरिटी फंड = 67.75 लाख (कर्मचाऱ्याचे योगदान 21.40 लाख आणि कंपनीचं योगदान रु. 6.54 लाख आहे. अशा प्रकारे एकूण योगदान 27.95 लाख रुपये झालं.) (नोट - यामध्ये व्याजदर 8.15 टक्के मोजण्यात आलाय.)
कशी होते गणना
पीएफ व्याजाची गणना पीएफ खात्यात दर महिन्याला जमा होणाऱ्या पैशांच्या आधारावर केली जाते, म्हणजेच मासिक चालू शिल्लक. पण, ती वर्षअखेरीस जमा केली जाते. ईपीएफओच्या नियमांनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत शिल्लक रकमेतून वर्षभरात कोणतीही रक्कम काढली गेली असेल तर त्यातून १२ महिन्यांचं व्याज कापले जाते.
(नोट - येथे EPF गणना अंदाजे करण्यात आली आहे. व्याजदरातील बदल, निवृत्तीचे कमी वय किंवा सरासरी वार्षिक पगार वाढीतील बदलांमुळे यात बदल होऊ शकतात.)