Lokmat Money > बिझनेस न्यूज > PFची रक्कम काढायचीय?; असा करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PFची रक्कम काढायचीय?; असा करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नोकरदारांना पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम हा मोठा आधार असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 07:17 PM2019-12-16T19:17:57+5:302019-12-16T19:22:50+5:30

नोकरदारांना पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम हा मोठा आधार असतो.

epf online withdraw process step by step guide to withdraw pf amount | PFची रक्कम काढायचीय?; असा करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PFची रक्कम काढायचीय?; असा करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्लीः नोकरदारांना पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम हा मोठा आधार असतो. निवृत्तीनंतर ही रक्कम फारच कामी येते. त्यामुळे ती काढण्याऐवजी बरेच जण खात्यात तशीच जमा करून ठेवतात. परंतु काही वेळा महत्त्वाची कामं किंवा गरजेसाठी ती रक्कम काढणं क्रमप्राप्त असतं. तसेच जर तुम्ही दोन महिन्यांपासून कुठेही नोकरी करत नसल्यास पीएफ खात्यात जमा झालेली पूर्ण रक्कम आपल्याला काढता येते. लग्न सोहळा आणि वैद्यकीय गरजेसाठी अंशतः ही रक्कम काढता येते. आता पीएफ काढायचा असल्यास ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करावा लागतो. Online PF Withdraw करण्याची पूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊयात. 

आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड UANशी जोडलेलं असल्यास ऑनलाइन पीएफ काढता येतो. त्याशिवाय आपला बँक खात्याचा नंबरसुद्धा कंपनी किंवा संबंधित मालकाकडून प्रमाणित केलेला असावा. अशा प्रकारे आपण सरळ EPFOकडे पीएफची रक्कम काढण्याचा अर्ज करू शकतो. परंतु तुमचे दोन्ही (आधार कार्ड आणि पॅन कार्ड) दस्तावेज UANशी जोडलेले नसल्यास Employerकडून पडताळणी करून घेणं गरजेचं असतं. तुमचा UAN नंबर सक्रिय असला पाहिजे. तसेच UAN हा मोबाइल क्रमांकाशीसुद्धा जोडलेला पाहिजे. या सर्व गोष्टींची खातरजमा केल्यानंतर Online PF Claim करण्यासाठीच्या या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.

  • असा करा ऑनलाइन अर्ज

 

  • https://unifiedportal-mem.epfindia.gov.in वर जा 

 

  • त्यानंतर UANनंबरच्या माध्यमातून पोर्टलवर लॉगिन करा
     
  • लॉग इन झाल्यानंतर ‘Manage’ टॅबवर क्लिक करा; त्या टॅबच्या माध्यमातून केवायसीशी संबंधित(आधार, पॅन आणि बँक अकाऊंट) माहिती बरोबर आहे का ते तपासून घ्या.  

 

  • जर केवायसीशी संबंधित माहिती अचूक असल्यास 'Online Services’ टॅबवर क्लिक करा आणि त्यामध्येच खाली असलेल्या Claim (Form-31, 19 & 10C)वर क्लिक करा. 

 

  • ‘Claim’ स्क्रीनवर खातेदाराचं वर्णन, केवायसी माहिती असेल. त्यानंतर बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून खातरजमा करून घ्या. 

 

  • प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासाठी “Yes”वर क्लिक करा; आता “Proceed for Online claim”चा सिलेक्ट करा,

 

  • क्लेम फॉर्ममध्ये पूर्ण रक्कम काढायची की अंशतः रक्कम काढायची आहे हे ठरवा; त्यानंतर Applicationला सबमिट करा
     
  • तुमच्या कंपनी किंवा मालकानं परवानगी दिल्यानंतर संबंधित रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम खात्यात जमा होण्यासाठी 15-20 दिवसांचा कालावधी लागतो

Web Title: epf online withdraw process step by step guide to withdraw pf amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.