Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO सदस्यांना किती पेंशन मिळते? निवृत्तीवेतनासाठी तुम्ही पात्र आहात का?

EPFO सदस्यांना किती पेंशन मिळते? निवृत्तीवेतनासाठी तुम्ही पात्र आहात का?

EPF Pension : ईपीएफओ सदस्याच्या मृत्यूनंतर त्याची पती/पत्नीला देखील पेंशन सुविधेचा लाभ मिळतो. तर एका वेळी जास्तीत जास्त २ मुलांसह २५ वर्षांपर्यंतच्या मुलांना लाभ मिळण्याचा अधिकार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:36 PM2024-10-29T16:36:51+5:302024-10-29T16:36:51+5:30

EPF Pension : ईपीएफओ सदस्याच्या मृत्यूनंतर त्याची पती/पत्नीला देखील पेंशन सुविधेचा लाभ मिळतो. तर एका वेळी जास्तीत जास्त २ मुलांसह २५ वर्षांपर्यंतच्या मुलांना लाभ मिळण्याचा अधिकार आहे.

epf pension how is pension amount calculated for pensioners | EPFO सदस्यांना किती पेंशन मिळते? निवृत्तीवेतनासाठी तुम्ही पात्र आहात का?

EPFO सदस्यांना किती पेंशन मिळते? निवृत्तीवेतनासाठी तुम्ही पात्र आहात का?

EPF Pension : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (EPS) निवृत्तीनंतर आजीवन पेंशन लाभ आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करते. केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन नियमांनुसार निवृत्त होणारी कोणतीही व्यक्ती किमान १० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर पेंशन प्राप्त करण्यास पात्र आहे. कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वय ५८ वर्षे पूर्ण झाल्यावर पेंशन मिळू शकते. मात्र, तुम्हाला किती पेंशन मिळेल? याची तुम्हाला माहिती आहे का?

पेंशनची रक्कम कशी मोजली जाते? 
पेंशन = (पेंशनपात्र पगार (गेल्या ६० महिन्यांची सरासरी) x पेंशनपात्र सेवा)/70.
समजा एखाद्या कर्मचाऱ्याने २३ व्या वर्षी कर्मचारी पेंशन योजनेत नाव नोंदवलं असेल. तो 58व्या वर्षी सेवानिवृत्त झाला. सध्याच्या १५,००० रुपयांच्या वेतन मर्यादेत योगदान देतो. तेव्हा त्याला ३५ वर्षे पूर्ण झाल्यावर पेंशन मिळेल. त्यावेळी त्याला सुमारे ७,५०० रुपये पेंशन मिळू शकते.    

फॉर्म्युला : (पेंशनपात्र वेतन x पेंशनयोग्य सेवा)/७० = (१५,००० x३५)/७० = ७,५०० रुपये.

पेंशनसाठी पात्रता काय?
पेंशन मिळविण्यासाठी ईपीएफ सदस्याने किमान १० वर्षे काम केले पाहिजे. असा व्यक्ती ५८ वर्षानंतर निवृत्त झाल्यास पेंशन घेण्यास पात्र ठरतो. पण, जर एखादी व्यक्ती ५८ वर्षानंतरही काम करत असेल तरीही ती व्यक्ती पेंशन घेण्यास पात्र असते. याव्यतिरिक्त, १० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केलेला व्यक्ती ५८ वयाच्या आधाही पेंशन घेऊ शकतो. EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर पती/पत्नीला (विधवा/विधुर) यांना वितरीत केली जाते. एका वेळी जास्तीत जास्त २ मुलांसह २५ वर्षांपर्यंतच्या मुलांना लाभ मिळण्याचा अधिकार आहे. कुटुंबात अपंग मूल असल्यास, त्यांना दोन मुलांच्या पेंशन व्यतिरिक्त आजीवन अपंगत्व निवृत्ती वेतन मिळते.

Web Title: epf pension how is pension amount calculated for pensioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.