Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO Alert! पीएफ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज ईपीएफओ वेबसाईटवर वापरता येणार नाही ही सुविधा

EPFO Alert! पीएफ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज ईपीएफओ वेबसाईटवर वापरता येणार नाही ही सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 02:35 PM2024-02-28T14:35:45+5:302024-02-28T14:36:47+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

EPFO Alert Important news for PF customers this facility aadhaar authentication cannot be used on EPFO website today | EPFO Alert! पीएफ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज ईपीएफओ वेबसाईटवर वापरता येणार नाही ही सुविधा

EPFO Alert! पीएफ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज ईपीएफओ वेबसाईटवर वापरता येणार नाही ही सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आधार ऑथेंटिकेशनशी संबंधित सेवांसाठी तुम्ही आज ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करणार असाल, तर तुमचं काम आजच होऊ शकणार नाही. दरम्यान, आज ही सेवा कार्यरत नाही. EPFO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या सदस्यांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. प्लॅटफॉर्मच्या आधार सेटअपच्या तांत्रिक देखभालीमुळे आधार ऑथेंटिकेशनशी संबंधित सेवा प्रभावित होतील, असं संस्थेनं एका ट्विटमध्ये म्हटलंय. 
 

अनेक युझर्सनं EPFO ​​वेबसाइटवर लॉगिन आणि क्लेम सबमिशनमध्ये येत असलेल्या समस्यांबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X वर तक्रार केली. एका युझरनं त्याचा पासवर्ड अपडेट करता येत नसल्याची तक्रार केली.तर दुसऱ्या युझरनं त्यांचा ऑनलाइन क्लेम सबमिट होत नसल्याची तक्रार केली. यावर उत्तर देताना टेक्निकल मेंटेनन्स कधीपर्यंत पूर्ण होईल आणि सेवा कधी सुरू होईल हे ईपीएफओने सांगितलेले नाही. 
 


 

जर ईपीएफओ सदस्यांना इतर कोणत्याही समस्येचं निराकरण करायचं असेल तर ते त्यांच्या ग्रिवांस चॅनेलवर जाऊन तक्रार करू शकतात. EPFO ने सोशल मीडिया X वर सांगितलं की ईपीएफओ ​​तक्रारी दाखल करण्यासाठी एक चॅनल चालवते. epfigms.gov.in या लिंकला भेट देऊन सदस्य त्यांची तक्रार नोंदवू शकतात. यानंतर त्यांना ग्रिवांस आयडी मिळेल आणि ते ईपीएफओला पाठवू शकतात. यानंतर डेस्क ते पुढे पाठवेल.

Web Title: EPFO Alert Important news for PF customers this facility aadhaar authentication cannot be used on EPFO website today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.