Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO Alert : पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान!

EPFO Alert : पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान!

EPFO Alert : ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 02:51 PM2022-06-29T14:51:12+5:302022-06-29T14:53:12+5:30

EPFO Alert : ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडू शकतात.

epfo alert never to share pan aadhar uan details over phone and social media see details | EPFO Alert : पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान!

EPFO Alert : पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान!

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सर्व सदस्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडू शकतात. जर ईपीएफ खात्याची (EPF Account) माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागली तर ते तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात.

ईपीएफओने म्हटले आहे की, ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांकडून आधार (Aadhaar), पॅन, यूएएन, बँक डिलेट्सची माहिती विचारत नाही. जर कोणी फोन किंवा सोशल मीडियावर अशी माहिती मागितली तर काळजी घ्या आणि ती अजिबात लीक करू नका. अशा फसव्या फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका किंवा अशा कोणत्याही मेसेजना रिप्लाय देऊ नका.

आपल्या सर्व सदस्यांसाठी एक अलर्ट जारी करत ईपीएफओ ​​ने ट्विटमध्ये लिहिले, 'आपल्या सदस्यांना कधीही फोन किंवा सोशल मीडियावर आधार, पॅन, यूएएन, बँक खाते किंवा ओटीपी सारखे वैयक्तिक डिटेल्स शेअर करण्यास सांगू नका.' ईपीएफओ पुढे म्हणते, ईपीएफओ कधीही कोणत्याही सेवेसाठी व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया इत्यादीद्वारे कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही.

फिशिंग ऑनलाइन फसवणूक 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, लोकांची मोठी कमाई पीएफ खात्यात जमा केली जाते. जी लोक सेवानिवृत्तीच्या खर्चासाठी जमा करतात. फसवणूक करणाऱ्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की येथे त्यांना एका झटक्यात मोठी रक्कम मिळेल, म्हणून ते फिशिंग अॅटकद्वारे खात्यावर हल्ला करतात. दरम्यान, फिशिंग हा ऑनलाइन फसवणुकीचा एक भाग आहे, ज्यामध्ये ठेवीदारांना फसवले जाते, त्यांच्याकडून खात्याशी संबंधित आवश्यक माहिती मिळवली जाते आणि नंतर खाते रिकामी केले जाते.

कधीही शेअर करु नका डिटेल्स 
पीएफ खातेधारकांनी चुकूनही खात्यात समाविष्ट असलेली आवश्यक माहिती पॅन क्रमांक, आधार क्रमांक, यूएएन आणि तुमचा पीएफ खाते क्रमांक शेअर करू नये. कारण ही अशी माहिती आहे, ज्यामुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते. एखादे काम सोडून इतरत्र जॉइन झालेल्या लोकांमध्ये अशी फसवणूक अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत, या लोकांनी कोणत्याही फिशिंग कॉल किंवा मेसजविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमचे वैयक्तिक डिटेल्स मागवले जात आहेत.

Web Title: epfo alert never to share pan aadhar uan details over phone and social media see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.