Join us

EPFO ची मोठी घोषणा! आता नोकरी बदलल्यानंतर PF खातं ट्रान्सफर करण्याची गरज नाही; सेंट्रलाइज सिस्टम येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 6:13 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आजच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आजच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रोव्हीडंट फंड (पीएफ) अकाऊंटच्या केंद्रीकृत प्रणालीला (सेंट्रलाइज सिस्टम)  मंजुरी दिली जाईल असं बैठकीत ठरविण्यात आलं आहे. याचाच अर्थ असा की एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी बदलली की त्याला पीएफ खातं ट्रान्सफर करण्याचा व्याप आता करावा लागणार नाही. कारण हे काम आता आपोआप होणार आहे. 

सेंट्रलाइज सिस्टमच्या माध्यमातून कर्मचाऱ्याचं जुनं पीएफ खातं नव्या खात्यात आपोआप विलीनीकृत होऊन जाईल. सध्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं एखादी कंपनी सोडली किंवा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनी नोकरी स्वीकारली की त्याचं नव्या कंपनीद्वारे नवं पीएफ खातं उघडलं जातं किंवा आधीच्या खात्यातील रक्कम खातेधारकाला ट्रान्सफर करावी लागते. आतापर्यंत पीएफ खातं ट्रान्सफर करण्याचं काम खातेधारकाराल स्वत:ला करावं लागत होतं. यासाठी जुन्या कंपनीशी निगडीत काही कागदपत्रांची पुर्तता करणं व इतर काही औपचारिकता पार पाडावी लागते. आता कर्मचाऱ्यांना कागदी घोडे नाचवावे लागणार नाहीत. 

नवा बदल काय होणार?सेंट्रलाइज सिस्टमच्या माध्यमातून पीएफ खातेधारकाची वेगवेगळी खाती मर्ज होऊन एकच खातं तयार होईल. याआधी खात्याचं विलीनीकरण करण्यासाठी खातेधारकाला स्वत:ला मेहनत घ्यावी लागत होती. आता खातेधारकानं नोकरी बदलली की नव्या कंपनीत सेंट्रलाइज पीएफ खात्याच्या माध्यमातून आधीच्या खात्यातील रक्कम सेंट्रलाइज खात्यात वळवली जाईल. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईपीएफओच्या २२९ व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत अजूनही वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यात व्याज वाढविण्यापासून पेन्शनधारकारांची कमीत कमी पेन्शन १ हजार रुपयांवरुन ३ हजार रुपये केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ट्रेड युनियननं श्रम मंत्रालय आणि ईपीएफओकडे पेन्सनची रक्कम ६ हजार रुपये करण्याची मागणी केलेली आहे. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीकेंद्र सरकार