नवी दिल्ली : फेब्रुवारीमध्ये संपलेल्या सहा महिन्यांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) नवी ३0 लाख खाती उघडण्यात आली आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी सरकारला बळ देणारी आहे. आपल्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती मोठा दारूगोळाच या आकडेवारीने पुरविला आहे.
भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) बुधवारी पहिल्यांदाच आपल्याकडील खात्यांची आकडेवारी जाहीर केली. तथापि, अकृषक क्षेत्रात नेमक्या किती नव्या नोकºया निर्माण झाल्या, याची आकडेवारी संघटनेला देता आली नाही.
हंगामी आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये ४,७२,0७५ नवे कर्मचारी ईपीएफमध्ये दाखल झाले. त्याआधी जानेवारीत ६,0४,५५७ नवी खाती उघडली गेली होती. त्याबरोबर सहा महिन्यांतील नव्या खात्यांची संख्या ३१.१ लाख झाली. एसबीआयचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्य कांती घोष यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत रोजगारात चांगली वाढ झाल्याचे दिसून येते.
रोजगारवाढीचा दावा अतिरंजित
जाणकारांनी सांगतात की, हा दावा अतिरंजित आहे. जास्तीत जास्त लोकांना ईपीएफच्या सुरक्षेत आणण्यासाठी कंपनीच्या वाट्याचे १२ टक्के योगदान तीन वर्षांसाठी सरकारने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपन्यांनी कंत्राटी कामगारांना ईपीएफमध्ये आणले आहे.
त्यामुळे ईपीएफ खाती वाढली आहेत.
हे लोक आधीच कामावर होते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने म्हटले की, भारतातील बेरोजगारीत मार्चला संपलेल्या नऊ महिन्यांत ६.२३ टक्के घट झाली आहे. या वित्तवर्षात नोकºया घसरून ४0.६० कोटींवर आल्या आहेत. गेल्या वर्षी त्या ४0.६७ कोटी होत्या.
रोजगार वाढल्याचा ईपीएफओचा दावा
३० लाख नवी खाती : प्रथमच आकडेवारी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:09 AM2018-04-27T01:09:09+5:302018-04-27T01:09:09+5:30