Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम

EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम

EPFO Claim Settlement : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पाहा काय आहे हा बदल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 08:34 AM2024-05-20T08:34:34+5:302024-05-20T08:35:29+5:30

EPFO Claim Settlement : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पाहा काय आहे हा बदल.

EPFO has changed the claim settlement rules this work will be done even without Aadhaar details know details | EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम

EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) क्लेम सेटलमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ज्या प्रकरणांमध्ये ईपीएफओ सदस्याचे निधन झाले आहे आणि त्यांचे आधार पीएफ खात्याशी जोडलेले नसेल किंवा माहिती जुळत नसेल, अशा प्रकरणांमध्ये संघटनेनं दिलासा दिला आहे. आता त्यांच्या नॉमिनींना आधार डिटेल्सशिवायही पीएफ खात्याची रक्कम मिळू शकणार आहे.
 

ईपीएफओनं नुकतंच यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ईपीएफ सदस्यांचा मृत्यू झाल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांचे आधार तपशील जोडण्यात आणि पडताळणी करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत ईपीएफ सदस्याच्या नॉमिनीला पैसे देण्यास उशीर होत होता.
 

प्रादेशिक अधिकारी देणार मंजुरी
 

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, सदस्याच्या मृत्यूनंतर आधार तपशील दुरुस्त करता येत नसल्यानं आता अशा सर्व प्रकरणांमध्ये आधार लिंक न करता प्रत्यक्ष आधारावर दावा पडताळणीला मान्यता देण्यात आली आहे. प्रादेशिक अधिकाऱ्याच्या परवानगीनंतरच हे करता येणार आहे. इतकंच नाही तर अशा प्रकरणांमध्ये फसवणूक रोखण्यासाठी मृत व्यक्तीचे सदस्यत्व आणि दावेदारांचीही चौकशी केली जाणार आहे.
 

येथे हा नियम लागू होणार
 

ईपीएफ यूएएनमध्ये सदस्याचा तपशील योग्य असला तरी आधार डेटामध्ये चुकीचा असेल अशा प्रकरणांमध्ये हा नियम लागू होईल. त्याचबरोबर आधारमधील तपशील योग्य पण यूएएनमध्ये चुकीचा असेल तर नॉमिनीला त्यासाठी स्वतंत्रपणे प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
 

नॉमिनीला आधार सबमिट करण्याची मुभा
 

आधार तपशील न देताच एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनीचा आधार तपशील सिस्टममध्ये सेव्ह होईल आणि त्याला स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली जाईल. मृत सदस्यानं नॉमिनी न केल्यास कुटुंबातील एक सदस्य आणि कायदेशीर वारसांना आधार कार्ड सादर करण्याची मुभा असेल.

Web Title: EPFO has changed the claim settlement rules this work will be done even without Aadhaar details know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.