केंद्र सरकार अनेक योजना राबवत असते. यात कर्मचाऱ्यांसाठीही योजना असतात, सरकार कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवते. तुम्हाला जर निवृत्तीनंतर आणखी पेन्शन मिळवायची असेल अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची संधी आहे. उच्च निवृत्ती वेतनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जून आहे. यासाठी आता तुमच्याकडे फक्त दोन दिवस उरले आहेत. शेवटच्या तारखेपूर्वी, अर्ज करणाऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ईपीएफओ पोर्टलद्वारे अर्ज सादर करण्यात खूप अडचण येत आहे. यामुळे, EPFO कडे उच्च निवृत्ती वेतनाची अंतिम तारीख वाढवण्याची मागणी केली जात आहे.
परदेश यात्रा होणार आणखी सोपी, आता मिळणार E-Passposrt; परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा
अहवालानुसार, अनेक नियोक्त्यांनी पीएफ फंड शेवटची तारीख वाढवण्यासाठी आणि अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी याचिका केली आहे. अर्ज प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्द्यांवर अजूनही स्पष्टीकरण आलेले नाही.
अर्जदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तज्ज्ञांच्या मते या गोंधळामुळे अर्जाची मुदत पुन्हा वाढवावी. पण अजुनही मुदत वाढवण्यात आलेली नाही.
४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च निवृत्ती वेतनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. त्यासाठी चार महिन्यांत नवीन पर्याय निवडण्यास सांगितले होते. नंतर ही मुदत ३ मार्च ते ३ मे २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. यासाठी ऑनलाइन सुविधा निर्माण करण्यात आली आहे. मात्र पेन्शनचा हिशोब कसा होणार याबाबत संभ्रम आहे. तसेच, पीएफ फंडातून पेन्शन फंडात पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील स्पष्ट नाही. अशा स्थितीत निवड करणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कर्मचारी संघटनांच्या अनेक प्रतिनिधींनी ईपीएफओला मुदत वाढवण्याची विनंती केली होती. हे लक्षात घेऊन उच्च निवृत्ती वेतनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
EPFO ने १ सप्टेंबर २०१४ नंतर पीएफ खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPS द्वारे उच्च निवृत्ती वेतन निवडण्याचा पर्याय दिला आहे. या अंतर्गत, १५,००० पेक्षा जास्त कमाई करणार्यांना देखील आता EPS मध्ये ८.३३ टक्के योगदान देण्याची संधी दिली जाणार आहे.