नवी दिल्ली : कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या 6 कोटी खातेधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुम्हालाही खूप मदत होईल. दरम्यान, ईपीएफओने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. (epfo important alert for 6 crore pf account holders do not share these important numbers)
ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्थात पीएफ सर्वात महत्वाची आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.
जाणून घ्या, EPFO ने काय म्हटले आहे?कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे, "ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही."
...तर होईल मोठे नुकसानअशा परिस्थितीत, ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सपासून नेहमी सतर्क रहा. यासोबतच ईपीएफओने बनावट वेबसाईट टाळण्याचा सल्लाही दिला आहे. जर तुम्ही ईपीएफओच्या अलर्टकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते.
बँकेकडूनही वेळोवेळी अलर्टदरम्यान, बँक देखील आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी दररोज अलर्ट जारी करते. बँक आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत राहते.
(EPFO पोर्टलवर सहजरित्या करू शकता ऑनलाईन PF ट्रान्सफर; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...)
बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढलॉकडाऊन दरम्यान बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, डिजिटल व्यवहारांमुळे वर्ष 2018-19 मध्ये 71,543 कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक झाली आहे. या काळात बँक फसवणुकीची 6800 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. 2017-18 मध्ये बँक फसवणुकीची 5916 प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये 41,167 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाली. गेल्या 11 आर्थिक वर्षांमध्ये बँक फसवणुकीची एकूण 53,334 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर त्यांच्या माध्यमातून 2.05 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.