EPFO Interest Rate : देशातील 7 कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी(दि.11) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ठेवींच्या व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्येच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता, ज्याला आता वित्त मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
Attention EPF Members
— EPFO (@socialepfo) July 11, 2024
The rate of interest for the Financial Year 2023-24 @ 8.25% for EPF members has been notified by the government in May of 2024. @LabourMinistry@mygovindia@MIB_India@PIB_India#EPFO#IntrestRate#EPFO#HumHainNaa#EPFOwithYou#ईपीएफओ
गेल्या वर्षीचा व्याजदर 8.15% होता, तर या वर्षी फेब्रुवारीमध्ये EPFO ने 2023-24 साठी 8.25% व्याजदर जाहीर केला होता. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना, EPFO ने सांगितले की, EPF सदस्यांसाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या 8.25% व्याजदराला सरकारने मंजुरी दिली आहे.
फेब्रुवारीमध्ये व्याज वाढवण्याची घोषणा
केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT), या EPFO च्या सर्वोच्च संस्थेने फेब्रुवारीमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी PF वर व्याज वाढवण्याची घोषणा केली होती. पीएफवरील व्याज वार्षिक 8.15 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. CBT च्या निर्णयानंतर, 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याजदर संमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता, ज्याला आज मान्यता देण्यात आली आहे.
व्याज कधी मिळते?
EPFO खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावर दरवर्षी व्याजदर जाहीर करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत सुमारे 7 कोटी कर्मचारी नोंदणीकृत आहेत. EPFO ने व्याजाचा निर्णय घेतल्यानंतर वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याज वर्षातून एकदा 31 मार्च रोजी दिले जाते.