Join us

ईपीएफओ गुंतविणार ५ टक्के निधी शेअर बाजारात

By admin | Published: April 25, 2015 12:59 AM

कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (ईपीएफओ) वार्षिक निधीच्या ५ टक्के निधी शेअर बाजारात गुंतविण्यास सरकारने परवानगी दिल्याने चालू आर्थिक वर्षात

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (ईपीएफओ) वार्षिक निधीच्या ५ टक्के निधी शेअर बाजारात गुंतविण्यास सरकारने परवानगी दिल्याने चालू आर्थिक वर्षात शेअर बाजारात ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते.ईपीएफओच्या निधीची गुंतवणूक करण्याची नवी पद्धत कामगार मंत्रालयाने अधिसूचित केली असून यातहत ईपीएफओला आपल्या वार्षिक जमा रकमेच्या ५ टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतविण्यास परवानगी देण्यात आली आहे.कामगार सचिव शंकर अगरवाल यांनी सांगितले की, ईपीएफओकडील गुंतवणुकीस योग्य रकमेपैकी ५ टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतविली जाईल. गुंतवणुकीचे नवीन स्वरूप दोन-तीन दिवसांआधीच अधिसूचित करण्यात आले आहे.२०१४-१५ मध्ये ईपीएफओकडे जवळपास ८०,००० कोटी रुपये जमा आहेत. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये ईपीएफओने सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत मासिक वेतनाची मर्यादा ६,५०० रुपयांवरून १५,००० रुपये करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात ईपीएफओच्या खात्यात १ लाख कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे. सार्वजनिक उपक्रमांच्या ईटीएफमध्ये किती गुंतवणूक करायची, हे आधी ठरविले जाईल. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करूनच गुंतवणुकीचा टक्का वाढविला जाईल, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले.