नवी दिल्ली - पीएफचे पैसे काढण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने याबाबत नवा नियम जाहिर केला आहे. पीएफमधून दहा लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी EPFOने घेतल्या निर्णयावर आता युटर्न घेतला आहे. पूर्वी पीएफमधून दहा लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी EPFOने ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला होता. पण आता EPFO ऑनलाईन अर्जासह ऑफलाईन सुविधाही सुरु ठेवली आहे. कर्मचाऱ्यांना पीएफ काढताना होणारा त्रास पाहता EPFOने ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
दरम्यान, नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निधी (पीएफ)वरील व्याजदर 2017-18 वर्षासाठी 8.55 टक्के होऊ शकतो. ईपीएफओने 2016-17 मध्ये 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2015-16मध्ये पीएफवरील व्याजदर 8.80 टक्के होता.