Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; PFच्या पैशांसंदर्भात पुढच्या आठवड्यात होणार मोठा निर्णय

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; PFच्या पैशांसंदर्भात पुढच्या आठवड्यात होणार मोठा निर्णय

नोकरी करणाऱ्यांना पुढच्या आठवड्यात एक मोठी बातमी समजणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 10:08 PM2019-08-15T22:08:54+5:302019-08-15T22:09:28+5:30

नोकरी करणाऱ्यांना पुढच्या आठवड्यात एक मोठी बातमी समजणार आहे.

epfo likely to appoint hsbc amc uti amc sbi mutual fund as fund mangers | नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; PFच्या पैशांसंदर्भात पुढच्या आठवड्यात होणार मोठा निर्णय

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; PFच्या पैशांसंदर्भात पुढच्या आठवड्यात होणार मोठा निर्णय

नवी दिल्लीः नोकरी करणाऱ्यांना पुढच्या आठवड्यात एक मोठी बातमी समजणार आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (EPFO) पुढच्या आठवड्यात निधी व्यवस्थापक बदलण्याच्या विचारात आहे. यासाठी EPFOचे विश्वस्त पुढच्या आठवड्यात देशातल्या मोठं भाग भांडवल असलेल्या कंपन्या HSBC AMC, UTI AMC आणि SBI म्युच्युअल फंडाबरोबर बैठक घेऊन तीन वर्षांसाठी व्यवस्थापकाची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार EPFOच्या सल्लागार वित्त लेखापरीक्षण आणि गुंतवणूक समिती(FAIC)ने त्यासाठी HSBC, UTC आणि SBI या कंपन्यांची नावं जवळपास निश्चित केली आहेत. यांची नियुक्ती 1 ऑक्टोबर 2019पासून तीन वर्षांसाठी केली जाणार आहे. 21 ऑगस्ट रोजी EPFOच्या विश्वस्तांची बैठक होणार आहे. 

EPFO 'या' पाच फंड हाऊसवर आहे अवलंबून- SBI, ICICI सिक्युरिटीज प्रायमरी डीलरशिप, रिलायन्स कॅपिटल, HSBC AMC आणि UTI AMCवर EPFO अवलंबून आहे. सामाजिक सुरक्षा निधी संकलन आणि वितरण करण्यावर EPFOचं पूर्ण लक्ष्य केंद्रित असते. सध्याचे व्यवस्था 1 एप्रिल 2015पासून लागू आहे. याअंतर्गत पीएफओच्या निधीच्या 50 टक्के रक्कम सरकारी योजनांमध्ये गुंतवता येते. तसेच 45 टक्के रकमेवर कर्जही काढता येते, तसेच EPFOमधली 15 टक्के रक्कम शेअर बाजारांत गुंतवण्याची सोय करून देण्यात आली आहे. सरकारी योजना आणि कर्ज रोख्यांवर वर्षाला 7 टक्के परतावा मिळतो. तर शेअर्समध्ये 16 टक्क्यांहून अधिकचा लाभ प्राप्त होतो. 

Web Title: epfo likely to appoint hsbc amc uti amc sbi mutual fund as fund mangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.