नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य देखील डिजिलॉकरच्या (Digilocker) सुविधेचा लाभ घेऊ शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच EPFO च्या सेवा डिजीलॉकरवर उपलब्ध आहेत. दरम्यान, यासाठी EPFO सदस्यांना हे अॅप फक्त त्यांच्या मोबाईलवर डाउनलोड करावे लागेल.
यासंदर्भात काल EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. यामध्ये माहिती दिली आहे की, सदस्य डिजीलॉकरद्वारे यूएएन कार्ड (UAN Card), पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि योजना प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात. ईपीएफओने याआधीही ही माहिती दिली आहे, परंतु सदस्यांच्या सोयीसाठी ही माहिती पुन्हा एकदा शेअर केली जात आहे.
दरम्यान, डिजीलॉकरवर मिळणाऱ्या यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि स्कीम सर्टिफिकेट यांसारख्या EPFO च्या सेवांमध्ये अॅक्सेस करण्यासाठी EPFO सदस्यांना पहिल्यांदा या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल. डिजीलॉकरवर उपलब्ध असलेल्या EPFO च्या सेवांमध्ये अॅक्सेस करण्यासाठी सदस्यांना रजिस्टर केल्यानंतर स्वतःला व्हेरिफाय करावे लागते आणि त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स यावर अपलोड करावी लागतील.
Members can download UAN Card, Pension Payment Order (PPO) and Scheme Certificate through #DigiLocker.#EPFO#EPF#Services#SocialSecurity#Employees#AmritMahotsav@AmritMahotsavpic.twitter.com/96UOJ2RXM6
— EPFO (@socialepfo) May 5, 2022
डिजिलॉकरचा कसे करू शकता?
सदस्य डिजीलॉकरच्या वेबसाइटवर किंवा तुमच्या स्मार्टफोनवर जाऊन हे अॅप डाउनलोड करू शकतात. त्यावर सदस्य अॅक्सेस करण्यासाठी, तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर वापरून लॉग इन करा. यासाठी OTP च्या मदतीने EPFO सदस्य आपला युजर आयडी देखील तयार करू शकतात.