कोरोना महासाथीच्या काळात (Corona virus pandemic) कारोनासह अन्य कोणत्याही प्रकारणच्या मेडिकल इमर्जन्सीसाठी (Medical Emergency) लागणाऱ्या रकमेसाठी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या उपचारासाठई एक लाथ रूपये (EPF Medical Advance) तात्काळ दिले जातील. ईपीएफनं आपल्या सदस्यांसाठी ही नवी सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यास संबंधित सदस्याला एक लाख रूपये तात्काळ दिले जातील.
ईपीएफचे सदस्य आता कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीच्या (EPF Medical Emergency Advance) परिस्थितीत १ लाख अॅडव्हान्स म्हणून आपल्या पीएफ खात्यातून तात्काळ काढू शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी बिल दाखवण्याचीही गरज नाही. रुग्णालयात भरती केल्याची कागदपत्रे दाखवल्यानंतर ही रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
१ जून रोजी काढलं पत्रकगेल्या महिन्यात १ जून रोजी ईपीएफओनं एक पत्रक काढलं होतं. यानुसार कोरोनासह कोणत्याही प्रकारच्या अन्य आजारांसाठी कोणी रुग्णालयात दाखल झालं तर ईपीएफओ सदस्यांना एक लाख रुपये मेडिकल इमर्जन्सी म्हणून देण्यात येतील, असं यात नमूद करण्यात आलं होतं.
काय असतील अटी?मेडिकल इमर्जन्सीच्या परिस्थितीत ईपीएफ सदस्य १ लाख रूपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. यासाठी ईपीएफनं सदस्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. या अंतर्गत रुग्णाला सरकारी किंवा पब्लिक सेक्टर युनिट रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. जर खासगी रुग्णालयात दाखल झालात तर एक अधिकारी त्याचा तपास करेल. त्यानंतर रुग्णालय आणि रुग्णांची संपूर्ण माहिती त्यांना द्यावी लागणार आहे.
त्यानंतर कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला रुग्णालय आणि रुग्णांची संपूर्ण माहिती देऊन एक अर्ज जमा करावा लागेल. त्यामुळे किती खर्च येईल याचा अंदाज नाही आणि मेडिकल अॅडव्हान्स जारी केला जावा असं त्यात नमूद करण्यात आलं पाहिजे. यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी सदस्य किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीकडून अर्ज दिल्यानंतर एका तासाच्या आत ही रक्कम दिली जाते. यापूर्वी मे महिन्यात EPFO बोर्डानं कोविड अॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापेक्षा ही सुविधा निराळी आहे.
काय आहे प्रक्रिया?
- ईपीएफओच्या epfindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर तुमचा UAN क्रमांक, पासवर्ज आणि कॅप्चा डिटेल्स टाकून तुमचा अकाऊंट लॉग इन करा.
- त्यानंतर ऑनलाईन सेवांवर क्लिक करून (क्लेम फॉर्म ३१- १९ १०सी आणि १० डी) वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या UAN ला जोडलेल्या तुमचं बँक खातं व्हेरिफाय करू टर्म आणि कंडिशन अॅक्सेप्ट करा.
- त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हा ऑनलाईन क्लेम हा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी असलेल्या मेडिकल इमर्जन्सी ऑप्शन सिलेक्ट करा.
- ड्रॉप डाऊन करत PF Advance सिलेक्ट करा. (Form 31). त्यानंतर पैसे काढण्याचं कारण निवडा. तसंच तुमची अपेक्षित रक्कम सिलेक्ट करून चेकची स्कॅन कॉपी अपलोड करून आपला पत्ता टाका.
- Get Aadhaar OTP वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी एन्टर करा. त्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल.