EPFO Data Leak: तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ईपीएफओच्या जवळपास २८ कोटी खातेधारकांची माहिती लीक झालाचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यात आधार कार्ड क्रमांकापासून बँक अकाऊंट संदर्भातील माहितीचा समावेश आहे.
दोन IP Address वरुन माहिती लीक युक्रेनच्या सायबर सिक्युरिटी रिसर्चर बॉब डियाचेंको (Bob Diachenko) यानं केलेला दावा भारतातील पीएफ खातेधारकांसाठी धक्कादायक ठरणारा आहे. त्यानं जाहीर केलेल्या माहितीनुसार २ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या आयपी अॅड्रेसवरुन पीएफ खातेधारकांची महत्वाची माहिती लीक झाली आहे. यातील एका आयपी अॅड्रेसवरुन २८,०४,७२,९४१ खातेधारकांची माहिती लीक झाली आहे. तर आणखी एका IP Address वरुन ८३,९०,५२४ खातेधारकांची माहिती लीक झाली आहे.
UAN नंबरपासून सर्व डिटेल्स लीकपीएफ खातेधारकांचा जो डेटा सार्वजनिक करण्यात आला आहे. यात खातेधारकाचा UAN क्रमांक, नाव, आधार कार्ड डिटेल्स, बँक अकाऊंट नंबर आणि नॉमिनीचे डिटेल्स देखील लीक करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार दोन्ही आयपी अॅड्रेस Azure होस्टेड आणि भारतातीलच आहेत.
ट्विटरवर दिली माहितीरिपोर्टनुसार डियाचेंको यानं इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय खातेधारकांचा डेटा लीक होण्याची पुष्टी होताच याची माहिती जाहीर करणाऱ्यानं ट्विटमध्ये इंडियन कॉम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमला देखील टॅग केलं आहे. CERT-In नं ट्विटला प्रतिक्रिया देत लीक बाबत त्याच्याकडे असलेली माहिती ई-मेलद्वारे मागवली आहे.