Join us

EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी मोठी बातमी; कोरोना अ‍ॅडव्हान्स पुन्हा काढू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:59 PM

covid-19 advance pf: सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची (PMGKY) घोषणा केली होती. यानुसार ईपीएफ सवस्क्रायबर दुसऱ्यांदा कोरोना अ‍ॅडव्हान्स नॉन रिफंडेबल योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

PF Advance Withdrawal: कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बहुतांश राज्यांत मे महिना हा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढविला आहे, तर काहींनी निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार बुडण्याबरोबरच कोरोना उपचाराचे मोठे संकट कोसळले आहे. यामुळे EPFO च्या या योजनेनुसार गेल्या वेळसारखाच परत न करण्यासाठी पीएफ अ‍ॅडव्हान्स काढता येणार आहे. (Employees' Provident Fund Organisation (EPFO) has now allowed its members to avail second non-refundable COVID-19 advance.)

Corona Treatment: दिलासा! कोरोना उपचारासाठी पैशांची गरज? सरकारी बँका देणार 5 लाखांचे अर्थ सहाय्य

सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची (PMGKY) घोषणा केली होती. यानुसार ईपीएफ सवस्क्रायबर दुसऱ्यांदा कोरोना अ‍ॅडव्हान्स नॉन रिफंडेबल योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. याचा अर्थ कोरोना संकटासाठी तुम्ही पीएफ मधून पैसे काढले तर ते तुम्हाला परत करायची गरज नाहीय. या योजनेनुसार पीएफ खातेधारक पीएफ खात्यात जमा रकमेच्या 75 टक्के किंवा तीन महिन्यांची बेसिक सॅलरी (बेसिक आणि डीए) एवढी रक्कम जी कमी असेल ती काढू शकणार आहे. 

कामगार मंत्रालयाने आज याची घोषणा केली आहे. यानुसार पीएफ धारक दुसरी नॉन रिफंडेबल कोविड-19 अ‍ॅडव्हान्स (Covid-19 advance) काढण्यास मंजुरी दिली आहे. यानुसार गेल्य़ा वर्षी ज्या खातेधारकांनी कोरोना संकटात खर्च भागविण्यासाठी पैसे काढले होते, ते आता पुन्हा पैसे काढू शकणार आहेत. कोरोना आणि ब्लॅक फंगसचे संकट पाहून मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

ईपीएफओने दिलेल्या या सुविधेचा लाभ कोरोना संकटावेळी अनेकांना झाला आहे. खासकरून ज्यांचा पगार 15000 रुपयांपेक्षा कमी होता. आता पर्यंत 76.31 लाख कर्मचाऱ्यांनी कोरोना नॉन रिफंडेबल अ‍ॅडव्हान्स घेतला आहे. त्यांना 18,698.15 कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे तीन दिवसांच्या आत खातेधारकाला दिले जात होते. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभविष्य निर्वाह निधीकर्मचारी