Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

EPFO Payroll Update: जुलै 2024 जोडले गेलेल्या 19.94 लाख EPFO सैदस्यांपैकी 10.52 लाख पहिल्यांदाच जोडले गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:26 PM2024-09-23T16:26:58+5:302024-09-23T16:27:44+5:30

EPFO Payroll Update: जुलै 2024 जोडले गेलेल्या 19.94 लाख EPFO सैदस्यांपैकी 10.52 लाख पहिल्यांदाच जोडले गेले आहेत.

EPFO Payroll Data: Employment up in country, 19.94 lakh new members added to EPFO in July 2024 | देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

EPFO Payroll Data : देशात रोजगाराच्या संधी नाहीत, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. पण, EPFO च्या आकडेवारीतून वेगळीच माहिती समोर येत आहे. जुलै 2024 EPFO सदस्य संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, जुलै 2024 मध्ये 19.94 लाख नवीन EPFO ​​सदस्य जोडले गेले आहेत. यातील 10.52 लाख सदस्य पहिल्यांदाच EPFO ​शी जोडले गेले आहेत. 

यामुळे सदस्य वाढले
या आकडेवारीची माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की, भांडवली खर्चावरील खर्चात झालेली वाढ, उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन (पीएलआय), रोजगार लिंक्ड प्रोत्साहन योजना या रोजगाराच्या संख्येत वाढ होण्यास कारणीभूत आहेत. याशिवाय, रोजगाराच्या बाजारपेठेचे औपचारिकीकरण आणि वेगवान आर्थिक वाढ यांनीही रोजगारांची संख्या वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

10.52 लाख पहिल्यांदा जोडले गेले
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की, जुलै महिन्यात 10.52 लाख EPFO ​​सदस्य पहिल्यांदाच सामाजिक सुरक्षा योजना EPFO ​​चे सदस्य झाले आहेत. जून 2024 च्या तुलनेत जुलै 2024 मध्ये 2.66 टक्के अधिक EPFO ​​सदस्य झाले, तर नवीन EPFO ​​सदस्यांची संख्या जुलै 2023 च्या तुलनेत 2.43 टक्के अधिक झाली.

महिला कामगारांमध्ये 10.94% वाढ
आकडेवारीनुसार, जुलै 2024 मध्ये EPFO ​​मध्ये जोडलेल्या सदस्यांमध्ये 18 ते 25 वयोगटातील 8.77 लाख तरुण आहेत. यातील 6.25 लाख सदस्य पहिल्यांदाच ईपीएफओचे सदस्य झाले आहेत. तर, जुलै महिन्यात EPFO ​​चे सदस्य बनलेल्या सदस्यांमध्ये 4.41 लाख महिला आहेत, त्यापैकी 3.05 लाख महिला पहिल्यांदाच EPFO ​​च्या सदस्य झाल्या आहेत. 

बांधकाम उद्योगाने सर्वाधिक रोजगार दिले
मंत्रालयाने म्हटले की, जुलै 2024 मध्ये सदस्य बनलेल्या 19.94 लाख EPFO ​​सदस्यांपैकी बहुतांश लोक उत्पादन, विपणन सेवा, संगणक, इमारत आणि बांधकाम उद्योगातील आहेत. यापैकी जास्तीत जास्त 108,209 नवीन EPFO ​​सदस्य बांधकाम उद्योगातील आहेत, 96,469 ​​सदस्य हे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल किंवा अभियांत्रिकी उत्पादनांतील आहेत आणि 63,129 सदस्य उत्पादन, विपणन सेवा आणि संगणक क्षेत्रातील आहेत.

Web Title: EPFO Payroll Data: Employment up in country, 19.94 lakh new members added to EPFO in July 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.