Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO Pension : नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला

EPFO Pension : नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला

epfo pension news : समितीने आता या हालचालीबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:53 PM2022-11-04T12:53:00+5:302022-11-04T12:54:15+5:30

epfo pension news : समितीने आता या हालचालीबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

epfo pension : parliamentary panel to seek explanation over epfo plan rejection | EPFO Pension : नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला

EPFO Pension : नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला

नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे. 

दरम्यान, पीएफ ग्राहकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र यासंदर्भातील कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळला आहे. पीएफ सदस्यांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये दरमहा 1,000 रुपये वाढवण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने दिला होता. यासंदर्भात संसदीय समिती अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागणार आहे. 

कामगार मंत्रालय आणि ईपीएफओच्या (EPFO) वरिष्ठ अधिकार्‍यांनी बीजेडी खासदार भर्तृहरि महताब यांच्या अध्यक्षतेखालील कामगार विषयक संसदीय स्थायी समितीला ईपीएफ पेन्शन योजनेच्या संचालनाविषयी आणि त्याच्या निधीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. अधिकाऱ्यांनी समितीला सांगितले की, मासिक पेन्शनमध्ये कोणत्याही वाढीच्या कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालय सहमत नाही.

याचबरोबर, समितीने आता या हालचालीबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने आपल्या अहवालात सदस्य/विधवा/विधवा पेन्शनधारकांना देय असलेली किमान मासिक पेन्शन किमान 2,000 रुपयांने वाढवण्याची शिफारस केली होती.

पेन्शनधारक आता ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पेन्शनधारक वर्षाच्या कोणत्याही वेळी आपले जीवन प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट ) ऑनलाइन सादर करू शकतात. यासंदर्भात कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) घोषणा केली आहे. यापूर्वी ही सुविधा उपलब्ध नव्हती. जीवन प्रमाणपत्र ठराविक वेळेपूर्वी सादर करावे लागले, अन्यथा पेन्शन थांबण्याची शक्यता होती.

Web Title: epfo pension : parliamentary panel to seek explanation over epfo plan rejection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.