नवी दिल्ली : पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पेन्शनधारक वर्षाच्या कोणत्याही वेळी आपले जीवन प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट ) ऑनलाइन सादर करू शकतात. यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) घोषणा केली आहे. यापूर्वी ही सुविधा उपलब्ध नव्हती. जीवन प्रमाणपत्र ठराविक वेळेपूर्वी सादर करावे लागले, अन्यथा पेन्शन थांबण्याची शक्यता होती.
ईपीएफओने एका ट्विटमध्ये जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन जमा करण्याबाबत माहिती दिली आहे. एका ट्विटमध्ये, ईपीएफओने लिहिले आहे की, पेन्शनधारक आता आपले जीवन प्रमाणपत्र वर्षाच्या कोणत्याही वेळी सबमिट करू शकतात, जे सबमिट केल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध असेल. दरम्यान, पेन्शनधारकांच्या सुविधा लक्षात घेऊन ईपीएफओने डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुरू केले आहे. यासाठी बँक किंवा पेन्शन एजन्सीकडे जाण्याची गरज नाही. पेन्शनधारक ते कोठूनही ऑनलाइन सबमिट करू शकतात. ज्या पद्धतीने जीवन प्रमाणपत्र ऑफलाइन किंवा ऑनलाइन सबमिट केले जाते ते तितकेच वैध आहे.
ईपीएफओने आपल्या ट्विटमध्ये प्रत्येक माहिती दिली आहे, जी पेन्शनधारकाला जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देते. ईपीएफओनुसार, पेन्शनधारक आपले जीवन प्रमाणपत्र पेन्शन जारी करणारी बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट ऑफिस, पोस्टमन, उमंग अॅप आणि जवळच्या ईपीएफओ कार्यालयात डिजिटल पद्धतीने जमा करू शकतात.
पेन्शनधारक स्वत: जाऊ शकत नसतील तर ते डोअरस्टेप सर्व्हिसची सुविधा घेऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या या सुविधेत पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी येऊन जीवन प्रमाणपत्र जमा करतात. पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त बँकेतही ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला या सेवेसाठी आधी अर्ज करावा लागेल. दरम्यान, जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करण्यासाठी, अर्जदाराकडे पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, आधारशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.
EPS’95 Pensioners can now submit Life Certificate at any time which will be valid for 1 year from date of submission.#EPFO#Pension#AmritMahotsav @AmritMahotsavpic.twitter.com/BNR79gCwjv
— EPFO (@socialepfo) August 28, 2022
उमंग अॅपद्वारे जीवन प्रमाणपत्र सबमिट करू शकता...
- पेन्शनधारकाला जीवन प्रमाण पोर्टल (https://jeevanpramaan.gov.in/) ला भेट द्यावी लागेल.
- सॉफ्टवेअर इन्स्टॉल आणि लॉन्च केल्यानंतर मोबाइल नंबर आणि आधार नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. यानंतर 'जनरेट ओटीपी' बटणावर क्लिक करावे लागेल. ज्यानंतर पेन्शनधारकाला आपला आधार लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी पासवर्ड मिळेल.
- व्हेरिफिकेशननंतर पेन्शनधारकाची ओळख प्रमाणित केली जाईल. आता पेन्शनधारकाला पुढील टॅब दिसून येईल. ज्यामध्ये संबंधित पेन्शनधारकाचे नाव, पीपीओ नंबर, पेन्शनचा प्रकार, मंजूर प्राधिकरण, वितरण संस्था, एजन्सी आणि खाते नंबर (पेन्शन) यासारखी अनिवार्य माहिती भरावी लागेल.
- आता पेन्शनधारकाला री-इंप्लाइड किंवा री-मॅरिड यापैकी एक निवडावे लागेल आणि संमती देण्यासाठी चेक बॉक्सवर टिक करावी लागेल.
- यानंतर 'स्कॅन फिंगर' ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आणि नंतर फिंगर / आयरिस स्कॅनिंगद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे लागेल.
- प्रभावी बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर, डिजिटल जीवन प्रमाणपत्र यशस्वीरित्या तयार केले जाईल. जीवन प्रमाण आयडी तयार केला जाईल आणि एकनॉलेजमेंटसाठी पेन्शनधारकाच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जाईल.
- यानंतर पेन्शनधारक 'प्रिंट' बटणावर क्लिक करून जीवन प्रमाणपत्र प्रिंट करू शकतो आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑटोमेटिकपणे पीडीएकडे ट्रांसफर किंवा डिजिटल स्वरूपात जमा केले जाईल.