नवी दिल्ली : बचत खाते असो किंवा एफडी किंवा बँक लॉकर, नॉमिनी (Nominee) करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, कर्मचारीभविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांचे नामांकित करणे आवश्यक आहे. EPF आणि EPS (Employee Pension Scheme) च्या बाबतीतही नॉमिनेशन केले पाहिजे, जेणेकरून EPFO सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास नॉमिनीला हा निधी वेळेत उपलब्ध होऊ शकेल.
7 लाखांची सुविधा मिळते
ईपीएफओ सदस्यांना विमा संरक्षणाची सुविधा सुद्धा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत मिळते. स्कीममधील नॉमिनीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. जर कोणत्याही नॉमिनेशनशिवाय सदस्याचा मृत्यू झाला तर क्लेमची प्रोसेस करणे कठीण होते.
6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, #EPFO कडून महत्त्वाची माहिती https://t.co/OEvcMAYaub
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2021
ई-नॉमिनेशन (E-nomination) सुविधा सुरू
EPFO ने आता नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई-नॉमिनेशन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ज्या लोकांकडे नॉमिनेशन नाही, त्यांना संधी दिली जात आहे. यानंतर ऑनलाइन नॉमिनीचे नाव, जन्मतारीख यासारखी माहिती अपडेट केली जाईल.
असे करा EPF/EPS मध्ये ई- नॉमिनेशन
EPFO वेबसाइटवर जा आणि 'सर्व्हिस' सेक्शनमध्ये 'फॉर इंप्लॉइज' वर क्लिक करा.
आता मेंबर UAN/ऑनलाइन सर्विस (ओसीएस/ओटीसीपी) वर क्लिक करा.
आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
'मॅनेज' टॅबमध्ये 'ई-नॉमिनेशन' निवडा.
यानंतर स्क्रीनवर ‘प्रोवाइड डिटेल्स’ टॅब दिसेल, 'सेव्ह' वर क्लिक करा.
फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी 'यस' वर क्लिक करा.
आता 'कौटुंबिक तपशील जोडा' वर क्लिक करा. एकापेक्षा जास्त नॉमिनी सुद्धा अॅड केले जाऊ शकते.
कोणत्या नॉमिनीच्या हिस्सामध्ये किती रक्कम येईल, याची घोषणा करण्यासाठी 'नॉमिनेशन डिटेल्स' वर क्लिक करा.
डिटेल्स अपलोड केल्यानंतर, ' सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन' वर क्लिक करा.
ओटीपी जनरेट करण्यासाठी 'ई-साइन' वर क्लिक करा. ओटीपी आधारसोबत लिंक मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.
ओटीपीला निर्धारित स्पेस टाकून सबमिट करा.