EPFO गुंतवणूदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आता तुम्हाला घरबसल्याच E-Nomination फाईल करता येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला यासाठी ईपीएफओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. तर गुंतवणूदाराचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला पेन्शन, फंड आणि इन्शुरन्सचा लाभ सहजरित्या मिळू शकणार आहे. काही दिवसांपूर्वीच ईपीएफओनं आपल्या ट्विटर खात्यावरून यासंदर्भातील माहिती जारी केली होती.
EPFO आपल्या गुंतवणूकदारांच्या सुविधेला ध्यानात घेता EPF (Employees Provident Fund) अथवा EPS (Employees Provident Scheme) अकाऊंट स्कीममध्ये घरबसल्याच आपली नॉमिनी जोडू शकतो. लोकांना यासाठी ऑफिसच्या चकरा माराव्या लागू नये, यासाठी संपूर्ण प्रक्रियाही डिजिटल करण्यात आली आहे.
ई-नॉमिनेशन (E-nomination) सुविधा सुरू
EPFO ने आता नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई-नॉमिनेशन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ज्या लोकांकडे नॉमिनेशन नाही, त्यांना संधी दिली जात आहे. यानंतर ऑनलाइन नॉमिनीचे नाव, जन्मतारीख यासारखी माहिती अपडेट केली जाईल.
असं करा EPF/EPS मध्ये ई- नॉमिनेशन
- EPFO वेबसाइटवर जा आणि 'सर्व्हिस' सेक्शनमध्ये 'फॉर इंप्लॉइज' वर क्लिक करा.
- आता मेंबर UAN/ऑनलाइन सर्विस (ओसीएस/ओटीसीपी) वर क्लिक करा.
- आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- 'मॅनेज' टॅबमध्ये 'ई-नॉमिनेशन' निवडा.
- यानंतर स्क्रीनवर ‘प्रोवाइड डिटेल्स’ टॅब दिसेल, 'सेव्ह' वर क्लिक करा.
- फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी 'यस' वर क्लिक करा.
- आता 'कौटुंबिक तपशील जोडा' वर क्लिक करा. एकापेक्षा जास्त नॉमिनी सुद्धा अॅड केले जाऊ शकते.
- कोणत्या नॉमिनीच्या हिस्सामध्ये किती रक्कम येईल, याची घोषणा करण्यासाठी 'नॉमिनेशन डिटेल्स' वर क्लिक करा.
- डिटेल्स अपलोड केल्यानंतर, ' सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन' वर क्लिक करा.
- ओटीपी जनरेट करण्यासाठी 'ई-साइन' वर क्लिक करा. ओटीपी आधारसोबत लिंक मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.
- ओटीपी निर्धारित ठिकाणी एन्टर करून सबमिट करा.