EPFO : सध्या ईपीएफओच्या वेबसाईटवर अनेकांना तांत्रिक अडचणी येतात. ईपीएफओ यावर काम करत आहे. ३१ मार्चनंतर EPFO ची कामे सोपी होणार आहेत. ईपीएफओची तांत्रिक दुरुस्तीचा पहिला टप्पा ३१ मार्चपर्यंत पूर्ण होऊ शकतो. ईपीएफओच्या या पहिल्या टप्प्याअंतर्गत, डेटाबेसचे केंद्रीकरण केले जाणार आहे.
तांत्रिक सुधारणानंतर क्लेम तसेच अन्य प्रक्रिया लगेच होणार आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च ही शेवटची तारीख आहे, या तारखेपर्यंत बहुतेक नवीन प्रणाली लागू होतील. या बदलाला आणखी काही वेळ लागू शकतो, पण ते शक्य तितक्या लवकर पूर्णपणे पूर्ण होईल आणि अंमलात आणले जाईल.
UPI मध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे अडकली कोट्यवधी लोकांची पेमेंट्स, कारण आलं समोर
युएन बेस्ड लेजरची सुविधा
सिस्टम किंवा CITES 2.01 म्हणून ओळखले जाणारे, UAN आधारित लेजर सुविधेसह हे नवीन प्लॅटफॉर्म EPFO च्या कामगिरीत सुधारणा करण्यास मदत होऊ शकते. या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नाचा उद्देश क्लेमची प्रक्रिया सुधारणे आहे. सेवा वितरण वाढविण्यासाठी पारंपारिक फील्ड ऑफिस अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरची जागा घेणे आहे. नवीन आयटी प्रणाली सर्व सदस्य खात्यांसाठी UAN आधारित खातेवही प्रदान करेल.
११.७८ कोटींहून अधिक खाती
या वर्षी ७ मार्चपर्यंत, ईपीएफओकडे ११.७८ कोटींहून अधिक सदस्य खाती होती, पण गेल्या अनेक वर्षांपासून, सदस्यांना वेळेवर सेवा दण्यात अडचणी येत आहेत, यामध्ये दाव्याची प्रक्रिया आणि सेटलमेंटमध्ये विलंब, खात्यांचे हस्तांतरण, ई-पासबुकमध्ये प्रवेश किंवा सदस्य प्रोफाइलमध्ये साधी दुरुस्ती यांचा समावेश आहे. याबाबत काही दिवसापूर्वी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
ईपीएफओ आता ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. सीआयटीईएस २.०१ अंतर्गत सध्याच्या सुधारणांच्या संचाच्या पूर्णतेनंतर त्यांचे प्लॅटफॉर्म आणखी आधुनिकीकरण करण्याची योजना आखत आहे.