Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! 6 कोटी PF खातेदारांना मिळणार आता 10 लाखांचं विमा संरक्षण

खूशखबर! 6 कोटी PF खातेदारांना मिळणार आता 10 लाखांचं विमा संरक्षण

नोकरदारांना मोदी सरकार लवकरच नवं गिफ्ट देणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 07:41 PM2019-11-05T19:41:53+5:302019-11-05T19:45:06+5:30

नोकरदारांना मोदी सरकार लवकरच नवं गिफ्ट देणार आहे.

epfo will increase life insurance amount of 6 crore pf subscribers to 10 lakhs | खूशखबर! 6 कोटी PF खातेदारांना मिळणार आता 10 लाखांचं विमा संरक्षण

खूशखबर! 6 कोटी PF खातेदारांना मिळणार आता 10 लाखांचं विमा संरक्षण

नवी दिल्लीः नोकरदारांना मोदी सरकार लवकरच नवं गिफ्ट देणार आहे. CNBC आवाजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO)नं आपल्या सदस्यांसाठी जीवन विमा (Life Insurance) संरक्षणाची रक्कम वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. विमा संरक्षण रक्कम 6 लाख रुपयांवरून वाढवून 10 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. किमान संरक्षण रक्कम 2.5 लाख  रुपयांवरून वाढवून 4 लाख रुपये होऊ शकते. दोन टप्प्यांत विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करण्याच्या प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (Central Board of Trustees)च्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. EPFO खातेदारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजने (EPS)शिवाय जीवन विमा संरक्षणाचाही आणखी एक मोठा फायदा मिळतो.  EPFOच्या सर्वच खातेदारांना  1976 (EDLI) अंतर्गत संरक्षण विमा पुरवला जातो. 

  • काय आहे EDLI योजना?

EPFमध्ये आपला 12 टक्के पैसा जमा होतो. त्याप्रमाणे यातील काही रक्कम EPF आणि पेन्शनमध्येही जात असते. EDLI (Employees Deposit Linked Insurance) योजनेंतर्गत कंपनीकडूनही 0.50 टक्के योगदान दिलं जातं.    

  • EDLI योजनेंतर्गत मिळते एवढी रक्कम

EDLI योजनेंतर्गत 6 लाख रुपयांपर्यंतचा संरक्षण विमा खातेदाराच्या वारसाला मिळतो. पीएफ खातेदाराचं आजारपण किंवा दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्यास खातेदाराचा वारस त्यातील रक्कम काढू शकतो. विशेष म्हणजे खातेदाराला कोणतीही अतिरिक्त रक्कम द्यावी लागत नाही. पीएफ खात्याशीही ते लिंक होतं.  

  • कशी मोजाल खात्यातील जमा रक्कम

EDLI योजनेंतर्गत खात्यात एक ठरावीक रक्कम रक्कम शेवटच्या पगारापर्यंत जमा होत असते. EDLIमध्ये पगाराची मर्यादा 15 हजार रुपये असते. तसेच आपल्याला ईपीएफओकडून 1.50 लाख रुपये बोनस दिला जातो. अशाच प्रकारे 6 लाख रुपये काढण्याचा दावा केल्यास [(30 x15,000) + 1,50,000] अशा पद्धतीनं ते पैसे मिळतात. 

Web Title: epfo will increase life insurance amount of 6 crore pf subscribers to 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.