Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईपीएफओची गृहयोजना

ईपीएफओची गृहयोजना

२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना साकार करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचाही (ईपीएफओ) हातभार लावण्याचा मानस आहे.

By admin | Published: July 10, 2015 11:27 PM2015-07-10T23:27:52+5:302015-07-10T23:27:52+5:30

२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना साकार करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचाही (ईपीएफओ) हातभार लावण्याचा मानस आहे.

EPFO's Plan | ईपीएफओची गृहयोजना

ईपीएफओची गृहयोजना

नवी दिल्ली : ‘२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना साकार करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचाही (ईपीएफओ) हातभार लावण्याचा मानस आहे. ईपीएफ सदस्यांना निवृत्तीपर्यंत मालकीच्या घरात पुढचे आयुष्य जगता यावे, या उद्देशाने गृह योजना राबविण्याबाबत ईपीएफओ विचार करीत आहे.
ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधी आयुक्त के.के. जालान यांनी सांगितले की, या प्रस्तावावर ईपीएफओचे विश्वस्त आणि कामगार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती काम करीत आहे. ही समिती लवकरच अहवाल देईल, अशी अपेक्षा आहे. कर्मचारी अंशदानाशी संलग्नित विमा योजनेतहत (१९७६) विम्याची रक्कम ४.५ लाख रुपये करण्याचाही ईपीएफओचा प्रस्ताव असल्याचेही जालान यांनी सांगितले. ज्या ईपीएफ सदस्यांचे दरमहा वेतन १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा ७० टक्के ईपीएफ सदस्यांना याचा लाभ होईल. ईपीएफ खात्यांसंबंधीचा तपशील मोबाईल फोनवर उपलब्ध करून देण्याची सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे कामगारमंत्री दत्तात्रय यांनी यावेळी सांगितले. ईपीएफच्या सदस्यांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग या योजनेमुळे मोकळा झाला आहे.
-----------------
६ कोटी ईपीएफ सदस्यांसाठी ‘पीएफ आपल्या नजीक’ (निधी आपके निकट) या उपक्रमाचा शुभारंभ करताना केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी या गृह योजनेसंबंधी सूतोवाच केले. ही योजना कशी असेल, ती कशी राबविली जाईल, याबाबतचा तपशील मात्र त्यांनी स्पष्ट केला नाही.
कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनुसार सरकारने निश्चित केलेल्या किमतीत घरे बांधण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, गृहवित्त संस्था तसेच एनबीसीसी, डीडीए, पीयूडीए, एचयूडीए यासारख्या सरकारी बांधकाम कंपन्यांचे सहकार्य घेतले जाईल.
--------------
पासबुकसारखी सेवा देण्यासाठी एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही सुरू करण्यात येणार असून, चालू वर्षअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहितीही जालान यांनी दिली.
ईपीएफओशी संबंधित असलेल्यांशी संपर्क-संवाद वाढविण्याच्या उद्देशातहत ‘निधी आपके निकट’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. हेच अभियान नंतर भविष्य निधी अदालतची जागा घेईल.
दर महिन्याच्या १० तारखेला हा उपक्रम घेण्यात येणार असून, शुक्रवारी देशभरातील ईपीएफओच्या १२२ कार्यालयांत हा उपक्रम घेण्यात आला.

Web Title: EPFO's Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.