Join us  

999 दिवसांसाठी 'या' बँकेत Fixed Deposit केल्यास मिळेल सर्वाधिक व्याज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 4:20 PM

Fixed Deposit : आता ESAF स्मॉल फायनान्स बँकेने (SFB) फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे.

नवी दिल्ली : तुम्हाला गुंतवणूक करायची असेल आणि सर्वाधिक व्याजासह चांगले पैसे मिळवायचे असतील तर बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये (FD) गुंतवणूक करा. यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि कोणतीही अडचण येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर देशातील सरकारी आणि खासगी बँका फिक्स डिपॉझिटवर (FD) व्याजदरात (Interest Rate) सातत्याने वाढ करत आहेत. 

आता ESAF स्मॉल फायनान्स बँकेने (SFB) फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. ESAF स्मॉल फायनान्स बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 15 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. नवीन रेजिडेंट टर्म डिपॉझिट आणि सध्याच्या रेजिडेंट टर्म डिपॉझिट केरिन्यूएल दोन्हींवर नवीन व्याज दर प्रभावी होतील.

फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात बदल केल्यानंतर बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत  मॅच्युर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर सामान्य लोकांना 4.00 टक्के ते 5.25 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर, ज्येष्ठ नागरिकांना फिक्स डिपॉझिटवर 4.50 ते 5.75 टक्के व्याज मिळेल. याशिवाय, ESAF स्मॉल फायनान्स बँक (SFB) 999 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.50 टक्के आणि गैर-ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.00 टक्के व्याजदर देत आहे.

999 दिवसांच्या FD वर मिळेल एवढे व्याज 183 दिवस ते एका वर्षात मॅच्युर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर 5.50 टक्के दराने व्याज मिळेल. बँक एक वर्ष एक दिवस ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. बँक दोन वर्ष ते 998 दिवसांच्या फिक्स डिपॉझिटवर 7.50 टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय, स्मॉल फायनान्स बँक (SFB) 999 दिवसांत (2 वर्षे 8 महिने आणि 25 दिवस) फिक्स डिपॉझिटवर जास्तीत जास्त 8.00 टक्के व्याज देत आहे. 1000 दिवस ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर व्याज मिळेल. 7.50 टक्के दराने उपलब्ध असेल.

5 ते 10 वर्षांच्या FD वर व्याजदरदरम्यान, या बँकेत गुंतवणूक केल्यास तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत आणि पाच वर्षे ते 10 वर्षे मुदतीच्या फिक्स डिपॉझिटवर अनुक्रमे 5.75 टक्के आणि 5.25 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याजदर रेजिडेंट रेकरिंग डिपॉझिटवर देखील लागू होतील. रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात 0.35 टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :गुंतवणूकबँकव्यवसाय