मुंबई : लॉकडाउनच्या काळात उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सहायता कक्ष (मैत्री) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एका सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.उद्योग सुरू करण्यासाठी http:/permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करून परवानगी प्राप्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय आवश्यकता भासल्यास maitri-mh@gov.in या ई-मेलही संपर्क साधता येणार आहे. तसेच संपर्कासाठी ०२२-२२६२२३२२, किंवा २२६२२३६२ या दूरध्वनी क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधता येणार आहे. उद्योजकांनी या सहायता कक्षाची मदत जरूर घ्यावी आणि आपला उद्योग पुन्हा सुरू करावा, असे आवाहन महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे. (वा.प्र.)
उद्योजकांच्या मदतीसाठी सहायता कक्ष स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 3:51 AM