Join us

‘प्रवास आता, पैसे नंतर’ची एतिहाद एअरवेजची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 2:34 AM

संयुक्त अरब अमिरातची (युएई) विमानसेवा एतिहाद एअरवेजने, ‘आता प्रवास करा, पैसे नंतर द्या’ (फ्लाय नाऊ, पे लॅटर) योजना सुरू केली आहे.

दुबई : संयुक्त अरब अमिरातची (युएई) विमानसेवा एतिहाद एअरवेजने, ‘आता प्रवास करा, पैसे नंतर द्या’ (फ्लाय नाऊ, पे लॅटर) योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार प्रवासी तिकिटाचे पैसे मासिक हप्त्यांत भरू शकतो, असे एअरलाइन्सने निवेदनात म्हटले. कुटुंबांना तिकिटांचे पैसे त्यांच्या गरजा व सोयींनुसार भरता यावेत, यासाठी ही योजना आहे. तीन ते साठ महिन्यांच्या हप्त्यांत पैसे भरता येतील. त्यासाठी १७ बँकांशी भागीदारी करण्यात आलेली आहे. संपूर्ण आॅनलाइन पेमेंट व्यवस्था राबविणारी एतिहाद एअरवेज ही आखातातील पहिली कंपनी आहे. विमान प्रवास हा खर्चिक असतो (विशेषत: कुटुंबांसाठी व ज्यांच्याकडे अनेक खर्च व मर्यादित उत्पन्न असते), याची आम्हाला कल्पना असल्यामुळे ही योजना हा वर्ग समोर ठेवून तयार केली आहे, असे एअरलाइन्सचे उपाध्यक्ष जस्टीन वार्बी म्हणाले.