Join us

रिटेल कंपन्यांसाठी ईटीपी समूहाचे दोन नवीन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 9:45 AM

ऑर्डाझल आणि ईटीपी युनिफाय मुंबईत केले सादर, व्यावसायिकांना होणार लाभ

मुंबई : रिटेल उद्योगातील व्यावसायिकांना अद्ययावत तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत ईटीपी समूहाने ऑर्डाझल आणि ईटीपी युनिफाय या दोन नवीन सॉफ्टवेअर प्रणाली सादर केल्या आहेत. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान याची घोषणा कंपनीच्या व्यवस्थापनाने केली. 

समूहाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश आहुजा यांनी सांगितले की, केवळ ऑनलाइनद्वारे व ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांद्वारे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. कंपनीच्या या सॉफ्टवेअरचा वापर केल्यास याचे फायदे व्यावसायिकांना होतील. 

व्यावसायिकांच्या उत्पादनांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व व्यावसायिकांना त्याचा फायदा होण्यासाठी कंपनीतर्फे एक सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये विविध ब्रँडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या उत्पादनासाठी ग्राहकांकडून जी सूचना करण्यात येते ती सूचना ही ईटीपी समूहास दिली जाते. त्यानंतर त्या सूचनांचा अंतर्भाव आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करत अधिकाधिक ग्राहक सुलभ व्यवस्था निर्माण करण्याकडे आमचा कल असल्याचे नरेश आहुजा यांनी सांगितले. 

यावेळी झालेल्या सादरणीकरणादरम्यान कंपनीचे संचालक नीव्ह आहुजा म्हणाले की, क्लाऊड व आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित सास प्लॅटफॉर्मचा वापर कंपनीने यासाठी केला. यामध्ये ४०० प्रकारच्या शक्यतांचा विचार करत या सॉफ्टवेअरची रचना करण्यात आली आहे. 

त्यामुळे कंपनीच्या गोदामात व्यवसायासाठी किती उत्पादन शिल्लक आहे, याची रिअल टाइम माहिती समजू शकेल. तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे ग्राहकांना अचूक ऑर्डर व तीही वेळेत पोहोचविणे शक्य होईल. याचा परिणाम हा व्यावसायिकांना नफा वाढविण्याच्या रूपाने होईल. 

ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे व्यवसायातील व्यावसायिकांना या सॉफ्टवेअर प्रणालीचा फायदा होणार आहे. ईटीपी समूह ई-कॉमर्ससाठी सॉफ्टवेअर निर्मिती करणाऱ्या क्षेत्रातील जागतिक कंपनी असून गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे.

टॅग्स :व्यवसाय