चेतन ननावरे, मुंबई
धनत्रयोदशीच्या पूर्व संध्येला सोने प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग आला आहे. दसऱ्यात चढ्या भावामुळे ३० टक्क्यांनी घटलेला सोन्याचा बाजार धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर २० ते २५ टक्क्यांनी वधारण्याची शक्यता सराफा संघटनेने व्यक्त केली आहे.
दसऱ्याला प्रतितोळा २७ हजारांचा टप्पा ओलांडलेले सोने ऐन दिवाळीत अपेक्षेप्रमाणे २६ हजारांवर उतरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग मिळालेला आहे.
दसऱ्याला थांबलेले ग्राहक दिवाळीआधी खरेदीसाठी गर्दी करत असल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली. जैन यांनी सांगितले की, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला सोन्याचा दर प्रति तोळा २७ हजार ४०० इतका होता. त्यामुळे ग्राहकांनीही खरेदीला हात आखडता घेतला. मात्र दिवाळीत अपेक्षेप्रमाणे सोने पुन्हा प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर गेल्या चार वर्षांत सोन्याचा दर कधीच २७ हजार रुपयांखाली गेला नव्हता. मात्र यंदा २६ हजार रुपयांपर्यंत उतरलेले सोने २५ हजार ५०० रुपयापर्यंत उतरण्याची शक्यता जैन यांनी व्यक्त केली
आहे.
जैन यांच्या म्हणण्यानुसार, साडेतीन मुहूर्तांपैकी पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. त्यामुळे गुरूवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाईल. शिवाय त्याआधी सोन्याचा दर कमी असल्याने खरेदीतील उत्साह कायम राहील.
सरकारच्या सुवर्ण योजनांचा फटका बसण्याची भीती
मुंबई : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची विक्री स्थिर राहील, असे काही सराफांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या तीन सुवर्ण योजनांना जास्त मागणी असेल, असे या सराफांना वाटते.
धनत्रयोदशी सोमवारी आहे. यावेळी धनत्रयोदशीला सोन्याची उलाढाल ही गेल्या वर्षीच्या याच दिवसाच्या तुलनेत तेवढीच किंवा त्यात किंचितशी वाढ झालेली असेल, असे अनमोल ज्वेलर्सचे ईशू दतवावानी यांनी सांगितले. यंदा उत्पन्नात घट झाली असून गेल्या दोन महिन्यांत विक्रीत किरकोळ वाढ झाली आहे. पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ म्हणाले की ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात उत्साह नाही; परंतु सोन्याचे भाव खाली आल्यामुळे खरेदीमध्ये काहीशी वाढ होईल.’ गाडगीळ यांनीही या धनत्रयोदशीला गुंतवणूक जास्त असेल, असे मत व्यक्त केले.
मोदी यांनी सुवर्ण मौद्रीकरण योजना, सॉव्हरीन सुवर्ण रोखे व भारतीय सुवर्ण मुद्रा या योजनांची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)
दसऱ्याला सोने खरेदीत निरुत्साह दिसल्याने सराफा बाजाराचा व्यवसाय ३० टक्क्यांनी घटला होता. त्यावेळी सराफा बाजाराची उलाढाल ही २२५ कोटी रुपयांपर्यंत घसरली होती.
दिवाळीत २० ते २५ टक्क्यांनी अधिक व्यवसाय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा सराफा बाजार ३२५ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
धनतेरसच्या पूर्वसंध्येला सोने २६ हजारांवर
धनत्रयोदशीच्या पूर्व संध्येला सोने प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग आला आहे. दसऱ्यात चढ्या भावामुळे ३० टक्क्यांनी घटलेला सोन्याचा बाजार धनत्रयोदशीच्या
By admin | Published: November 9, 2015 12:34 AM2015-11-09T00:34:21+5:302015-11-09T00:34:21+5:30