नवी दिल्ली : अनेक शहरांमध्ये ५जी सेवा सुरू झाली आहे. मात्र, त्यातून मिळणारा वेग, काॅल ड्राॅपची समस्या इत्यादींवरून केंद्र सरकार नाराज आहे. त्यामुळे लवकरच दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांची बैठक बाेलाविण्यात येणार आहे. त्यात या समस्यांसाेबतच उर्वरित भागातील ५जी लाॅंचिंगचा आढावा घेतला जाउ शकताे.
‘ट्राय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की शहरी भागात ५जी कव्हरेज आणि कनेक्टीव्हीटीची समस्या आहे. त्यामुळे ५जी सेवेच्या गुणवत्तेच्या मापदंडांबाबत चर्चा करण्यात येईल.
५जी स्पीड तरी लाेक हैराण! सरकार नाराज
5G speed: अनेक शहरांमध्ये ५जी सेवा सुरू झाली आहे. मात्र, त्यातून मिळणारा वेग, काॅल ड्राॅपची समस्या इत्यादींवरून केंद्र सरकार नाराज आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 04:44 AM2023-04-21T04:44:49+5:302023-04-21T04:45:18+5:30