Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका, चीनमध्येही असे तंत्रज्ञान नाही, पाकिस्तानलाही हवेय...; भारतासाठी गौरवास्पद...

अमेरिका, चीनमध्येही असे तंत्रज्ञान नाही, पाकिस्तानलाही हवेय...; भारतासाठी गौरवास्पद...

पाकिस्तान देखील भारतीय प्रणालीवर फिदा झालेला आहे. यामुळे जगात एक डिजिटल क्रांती होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 01:57 PM2023-01-26T13:57:50+5:302023-01-26T13:58:28+5:30

पाकिस्तान देखील भारतीय प्रणालीवर फिदा झालेला आहे. यामुळे जगात एक डिजिटल क्रांती होणार आहे. 

Even America, China does not have such technology like UPI, Pakistan also wants it...; Glorious for India... | अमेरिका, चीनमध्येही असे तंत्रज्ञान नाही, पाकिस्तानलाही हवेय...; भारतासाठी गौरवास्पद...

अमेरिका, चीनमध्येही असे तंत्रज्ञान नाही, पाकिस्तानलाही हवेय...; भारतासाठी गौरवास्पद...

युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय (UPI) प्लॅटफॉर्म हा भारताने बनविलेला आहे. आजा अब्जावधींत याद्वारे व्यवहार केले जात आहेत. भारताने युपीआय योग्यरित्या लागू केले आहे. आमुळे आता जगभरातील देशांनाही युपीआयचा हेवा वाटू लागला आहे. अमेरिका, चीनसारख्या देशांतही अशी सिस्टिम नाहीय, पाकिस्तानही भारताकडून युपीआय सिस्टिम खरेदी करण्यासाठी तरसत आहे. 

UPI ची संपूर्ण प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने तयार केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या देखरेखीखाली लागू केली. या युपीआय पेमेंटची खरी गरज कोरोना काळात लक्षात आली. लोकांना पैसे काढण्यासाठी ना बँकेत जावे लागत होते, ना सुट्टे पैसे द्यावे लागत होते. कोड स्कॅन केला की दुकानदाराला पैसे पाठविता येत होते. या शहरातून त्या शहरात अचानक पैशांची गरज लागली तरी देखील काही सेकंदांत पैसा पाठविता येत आहेत. रशियाला जेव्हा बंधने आली तेव्हा अशा सिस्टीमची कमतरता जाणवली होती. 

सध्या फक्त भारतच नाही तर भूतान, UAE, श्रीलंका यासह अनेक देशांमध्ये UPI द्वारे पेमेंट केले जात आहे. यासोबतच कॅनडासह जवळपास 12 देशांमध्ये UPI पेमेंट सुरू करण्यात आले आहे. याकडे बँकिंगच्या जगात बदल म्हणून पाहिले जात होते. अमेरिका आणि चीनमध्येही भारताच्या UPI आधारित पेमेंट तंत्रज्ञानासारखी यशस्वी UPI प्रणाली नाही. स्वतः अमेरिकन देखील अमेरिकेचे UPI पेमेंट वापरत नाहीत. हीच स्थिती चीनची आहे. तर भारतीय UPI दररोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे.

पाकिस्तान देखील भारतीय UPI प्रणालीवर फिदा झालेला आहे. भारतीय यूपीआय त्यांना हवा आहे. मात्र, सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तानचे राज्यकर्ते यूपीआय प्रणालीपासून दूर राहत आहेत. डिसेंबर महिन्यात भारतात विक्रमी UPI पेमेंट करण्यात आले होते. 2.82 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. UPI ही मोफत सेवा आहे. जे इंटरनेटसह आणि इंटरनेटशिवाय देखील वापरले जाऊ शकते. यामुळे जगात एक डिजिटल क्रांती होणार आहे. 

Web Title: Even America, China does not have such technology like UPI, Pakistan also wants it...; Glorious for India...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.