Join us

FD मध्ये गुंतवणूक करूनही तयार करू शकता मोठा फंड, वापरा ही ट्रिक, मिळेल जबरदस्त नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 12:44 PM

गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे एफडी (FD) पेक्षा चांगला परतावा देतात. परंतु आजही अनेक लोक फिक्स्ड डिपॉझिटना प्राधान्य देतात

आजच्या काळात, गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे एफडी (FD) पेक्षा चांगला परतावा देतात. परंतु आजही अनेक लोक फिक्स्ड डिपॉझिटना प्राधान्य देतात. एफडीमध्ये तुम्हाला हमी परतावा मिळतो आणि तुमचे पैसेही सुरक्षित असतात. जर तुम्ही देखील अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल जे गुंतवणुकीच्या बाबतीत एफडीवर अधिक विश्वास ठेवतात तर तुम्ही एफडी लॅडरिंग टेक्निक अवलंबली पाहिजे. याच्या मदतीने तुम्ही एफडीच्या माध्यमातूनही मोठा निधी जमा करू शकता.

काय आहे FD Laddering Techniqueएफडी लॅडरिंग टेक्निकमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक एफडी चालवाव्या लागतात आणि तेही वेगवेगळ्या कालावधीसाठी. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 5 लाख रुपयांची एफडी करायची असेल, तर ती एकत्र करण्याऐवजी, प्रत्येकी 1-1 लाखाच्या 5 एफडी करा आणि ही एफडी 1, 2, 3, 4 आणि 5 वर्षे या वेगवेगळ्या कालावधीसाठी करा.

असा मिळेल  FD Laddering Techniqueचा फायदाजेव्हा तुम्ही तुमची एफडी 1, 2, 3, 4 आणि 5 वर्षांसाठी फिक्स करता, तेव्हा दरवर्षी तुमची एक एफडी मॅच्युअर होईल. पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा ती एफडी फिक्स करा. अशाप्रकारे, तुमची एफडी जसजशी मॅच्युअर होत जाईल, तसतशी तुम्ही ती पुढील 5 वर्षांसाठी फिक्स करा. यामुळे तुम्हाला दोन फायदे होतील. प्रथम, दरवर्षी एफडी मॅच्युअर होण्याच्या ऑर्डरमुळे तुम्हाला कोणत्याही लिक्विडिटीच्या संकटाचा सामना करावा लागणार नाही आणि दुसरा फायदा म्हणजे, तुम्ही ही रक्कम पुन्हा मॅच्युअर केल्यास, पुढील 10 ते 15 वर्षांत एफडीद्वारे मोठ्या प्रमाणात निधी उभा करू शकता.

निवृत्त लोकांसाठी अधिक फायदानिवृत्त लोकांसाठी एफडी लॅडरिंग टेक्निक खूप प्रभावी मानलं जातं. एफडी मॅच्युअर झाल्यानंतर, ते व्याजाची रक्कम वापरू शकतात आणि उर्वरित पैसे पुन्हा फिक्स करू शकतात. अशा प्रकारे, त्यांना पैशाची कोणतीही अडचण येत नाही. जमा केलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते आणि त्यांना त्यावर सतत व्याज मिळत राहतं.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :बँकपैसागुंतवणूक