Join us

मुंबई, दिल्लीत राहणेही झाले कठीण; घरभाड्यात तब्बल १५ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 10:35 AM

हाँगकाँग जगातील सर्वाधिक महागडे शहर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दुसऱ्या शहरातून आलेल्यांसाठी भारतातील मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरू ही सर्वाधिक महागडी शहरे आहेत. दुसऱ्या देशातील नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी हाँगकाँग, सिंगापूर तसेच स्वित्झर्लंडमधील झुरिक, जिनेव्हा आणि बेसिल ही शहरे सर्वाधिक महागडी आहेत.

मर्सरच्या ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे २०२३’मधून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, जगात सर्वाधिक १३ ते १५ टक्के घरभाडे वाढ मुंबईत झाली आहे. दरवर्षी यात वाढ होत आहे.

४३ शहरांमधील घरे झाली महाग 

आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) चौथ्या तिमाहीत ४३ शहरांमध्ये मालमत्तांच्या किमती वाढल्या आहेत. एनएचबीने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, सर्वेक्षण केलेल्या ५० शहरांपैकी सात शहरांमध्ये घरांच्या किमती कमी झाल्या आहेत.

जीवनमान  कुठे स्वस्त?

हवाना (क्युबा), कराची आणि इस्लामाबाद (पाकिस्तान), बिसकेक (किर्गिस्तान), दुसान्बे (ताजिकिस्तान).

गेल्या काही वर्षांत ग्राहकांना आपले हक्काचे घर हवे आहे. यामुळे घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रशस्त घरांची मागणीही वाढली आहे.

..असे वाढले घरभाडे

रँकिंग    शहर    वाढ१४७    मुंबई    १५%१८९    बंगळुरू    ०८%१६९    नवी दिल्ली ०७%१८४    चेन्नई    ०५%२१३    पुणे    ०५%

घरांच्या किमती कुठे वाढल्या?

अहमदाबाद १०.८%बेंगळुरू ९.४%चेन्नई ६.८%दिल्ली १.७%हैदराबाद ७.९%कोलकाता ११%मुंबई ३.१%पुणे ८.२%

 

टॅग्स :मुंबईदिल्ली