Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रत्येक पेट्रोल पंपावर रोज वेगवेगळे दर

प्रत्येक पेट्रोल पंपावर रोज वेगवेगळे दर

उद्या, १६ जूनपासून देशातील पेट्रोल पंपावरचे दर दररोज ठरणार आहेत. पण, प्रत्येक पेट्रोल पंपावर ते वेगवेगळे असू शकतील. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन आॅइल

By admin | Published: June 16, 2017 04:24 AM2017-06-16T04:24:13+5:302017-06-16T04:24:13+5:30

उद्या, १६ जूनपासून देशातील पेट्रोल पंपावरचे दर दररोज ठरणार आहेत. पण, प्रत्येक पेट्रोल पंपावर ते वेगवेगळे असू शकतील. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन आॅइल

Every daily rate on every petrol pump | प्रत्येक पेट्रोल पंपावर रोज वेगवेगळे दर

प्रत्येक पेट्रोल पंपावर रोज वेगवेगळे दर

लखनऊ : उद्या, १६ जूनपासून देशातील पेट्रोल पंपावरचे दर दररोज ठरणार आहेत. पण, प्रत्येक पेट्रोल पंपावर ते वेगवेगळे असू शकतील. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मोठ्या कंपन्या शुक्रवारपासून इंधनाच्या दरात दररोज बदल करणार आहेत. बाजारातील घटकांच्या आधारावर यात १५ पैशांचा फरक असू शकेल.

प्रत्येक पंपावर डिस्प्ले बोर्ड असेल. तेल कंपन्या दररोज रात्री ८ वाजता डीलर्सना दराबाबत एसएमएस व ईमेलने सूचना देतील.
प्रत्येक पंपाला ट्रान्सपोर्ट
खर्च वेगळा लागणार आहे. त्यानुसार दर ठरतील. प्रतिस्पर्धी कंपनी कमी दरात इंधन विक्री करत असेल तर दर वेगळे असू शकतात.
हा फरक १० ते १५ पैसे एवढा असेल. फिल्ड आॅफिसरला संपर्क करता येईल. या अधिकाऱ्याचे नाव आणि नंबर पंपावर असेल.
दोषींची डीलरशिप रद्द केली जाऊ शकेल. शिवाय शिक्षा करण्याचीही तरतूद आहे.

पेट्रोल, डिझेल स्वस्त ...
पेट्रोलच्या दरात गुरुवारी १.१२ रुपयांची तर, डिझेलच्या दरात १.२४ रुपयांची कपात झाली. दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या बदलानुसार हे दर जाहीर करण्यात आले आहेत. पेट्रोलचे दर दिल्लीत आता ६५.४८ रुपये प्रति लीटर असतील. डिझेलचे दर सध्याच्या ५५.९४च्या तुलनेत ५४.४९ रुपये असतील.

Web Title: Every daily rate on every petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.