Join us

‘सर्व लोकांना मिळावी मोफत कोरोना लस’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 12:26 AM

कायम घरातून काम करण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस विकसित झाल्यानंतर ती जगातील सर्व लोकांना मोफत मिळाली पाहिजे. ती लस बनविण्यासाठी येणारा खर्च औषध कंपन्यांना संबंधित देश किंवा संयुक्त राष्ट्रांनी द्यायला हवा, असे इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. कायमस्वरूपी घरातून काम करण्यासही त्यांनी विरोध केला आहे.

त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांनी कोरोना लसनिर्मितीच्या खर्चाचा मोठा भार स्वत:हून पेलला पाहिजे. नारायण मूर्ती म्हणाले की, कोरोनाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून सध्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली. मात्र हा तात्कालिक उपाय आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. भारतात अनेकांची घरे आकाराने लहान असतात. तिथे कामावर लक्ष केंद्रित होणे कठीण असते. 

शाळा बंद ठेवू नका  n इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती म्हणाले की, कोरोना संसर्गापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक बंधने पाळली पाहिजेत. मात्र ते करताना शाळा मात्र बंद ठेवू नयेत. nदेशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक प्रश्न आहेत. मात्र त्यात सुधारणा होण्याची चिन्हे काही क्षेत्रांत दिसत आहेत. मागणी वाढविल्यासच रोजगारांसंदर्भातील स्थिती सुधारू शकते.

टॅग्स :नारायण मूर्तीकोरोना वायरस बातम्या